जयशंकर यांचा मास्टरस्ट्रोक! इराणने फक्त भारतासाठीच खुले केले तेल दरवाजे; अमेरिका बघतच राहिली
मंगळवारी (१० मार्च २०२६) रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री मंत्री सैयद अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले होते. या वेळी भारताने आपल्या व्यापारी हितसंबंधाच्या आणि उर्जा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
इराणने भारताच्या या भूमिकेचा आदर केला. या चर्चेनंतर इराणने गुरुवारी (१२ मार्च) भारतीय जहाज लावलेला जहाजांना कोणताही धोका निर्माण होणार नाही असे जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे दोन भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे.
होर्मुझचा सागरी मार्ग पर्शियन आणि ओमानच्या सागरी मार्गांना जोडणारा एकमेवर मार्ग आहे. जगातील एकूण कच्चा तेलाच्या व्यापारापैकी २० ते ३० टक्के तेल व्यापार या मार्गावरुन केला जातो. सौदी अरेबिया (Saudi Arabia), इराक, कुवैत आणि UAE यांसारखे मोठे तेल उत्पादक देश या मार्गावरुन जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा करतात. तर भारता या मार्गावरुन आपल्या गरजेच्या कच्चा तेलाच्या सुमारे ३०% ते ५०% तेल आयात करतो.
अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संयुक्तपणे इराणवर लष्करी कारवाऊई सुरु केली होती. या कारवाईत इराणच्या अणु केंद्रांना आणि लष्कर तळांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे इराण पेटून उठला होता. यानंतर इराणने अमेरिका-इस्रायलविरोधात महायुद्धाची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा केल मार्ग होर्मुझ बंद केला होता. तज्ज्ञांच्या मते, असे करुन इराणला अमेरिकेवर जागतिक दबाव निर्माण करायचा होता.






