Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : रशिया बनला इराणचा ‘तिसरा डोळा’! अमेरिकेच्या नाकाखालून पुरवतोय लष्करी तळांची गुप्त माहिती?

Middle East War Update : मध्यपूर्वेतील युद्धाना जागतिक स्तरावर प्रचंड अस्थिरता निर्माण केली आहे. दावा केला जात आहे की, या युद्धात रशिया इराणला गुप्तपणे मदत करत आहे. तसेच यामध्ये चीनचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 11:23 PM
Russia Secretly Helping Iran in War

Russia Secretly Helping Iran in War

Follow Us
Follow Us:
  • रशिया बनला इराणचा ‘तिसरा डोळा’
  • अमेरिकेच्या नाकाखालून पुरवतोय लष्करी तळांची गुप्त माहिती?
  • चीनही एन्ट्री?
Russia Secretly Helping Iran in War : मॉस्को/तेहरान : मध्यपूर्वेतील संघर्ष आता अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक टप्प्यावर आहे. गेल्या १८ दिवसांपासून हे युद्ध सुरु असून जागतिक जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा (US-Israel VS Iran War) बाबात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दावा केला जात आहे की, रशिया (Russia) इराणला या युद्धात गुप्तपणे अमेरिकन लष्करी तळांची माहिती पुरवत आहे. यामुळे इराण अत्यंत अचूकतेने हल्ले करत आहे. या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran War : ‘आमच्या वाट्याला गेलात तर…’ ; ट्रम्प यांना इराणचा शेवटचा इशारा, युद्धबंदीसाठी ठेवली ‘ही’ मोठी अट

इराणने अमेरिका(America)-इस्रायलच्या कारवाईनंतर अत्यंत आक्रमक भूमिका घेत मध्यपूर्वेतील आखाती देशामंध्ये अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ला केला होता. हल्ला इतका भयंकर आणि अचूक होता की अमेरिकाही संभ्रमात पडली होती. याच पार्श्वभूमीवर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांमध्ये दावा केला जात आहे की, इराणच्या या अचूक हल्ल्यांमागे रशियाची सॅटेलाइट इंटेलिजेंसची शक्ती आहे.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, रशिया आपल्या प्रगत सॅटेलाइट नेटवर्कद्वारे इराणला अमेरिकी युद्धनौका आणि लष्करी तळांचे अचूक लोकेशन पोहचवत आहे. या रिअल-टाइम डेटाच्या मदतीने इराण(Iran) ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकन ताफ्यांना लक्ष्य करण्यात यशस्वी होत आहे. रशिया इराणसाठी एका तिसऱ्या डोळ्याप्रमाणे कार्य करत आहे. यामुळे अमेरिकेची सुरक्षा यंत्रणाही चक्रावून गेली आहे.

रशिया-इराण संबंध

रशिया आणि इराणचे लष्करी संबंध हे अत्यंत मजबूत आणि देवाण-घेवाणीवर आहेत. युक्रेन युद्धात इराणने रशियाला मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची मदत पाठवली होती. यामुळे इराण संकटात असताना रशिया त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी चर्चाही केली होती. परंतु यावेळी त्यांनी युद्धात सहकार्यास नकार दिला होता. मात्र लष्करी हालचालींवरुन रशिया इराणला मदत करत असल्याचे चित्र दिसत आहे.

इराणपुढे अमेरिका हतबल

इराणच्या सतत आणि अचूक हल्ल्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा निकामी झाल्या आहेत. यामुळे अमेरिका सध्या बचावात्मक भूमिक घेत आहे. अमेरिकेने ड्रोन इंटरसेप्टर युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात देण्याचे मान्य केले होते. परंतु आता हे ड्रोन इंटरसेप्टर इराणच्या दिशेने वळवण्यात आले आहे.

चीनचाही सहभाग

याच वेळी चीन(China) ही अत्यंत सावधगिरीने इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवत असल्याचा दावा अहवालांमध्ये करण्यात आला आहे. थेट लष्करी संघर्षात पडणे चीनने टाळले असले तर इराणच्या तेलावरील अवलंबित्वामुळे चीन त्याला पाठिंबा देत आहे. शिवाय इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रशिया-चीनच्या सहकार्याची पुष्टी केल्यामुळे अमेरिका विरोधात ही तिघडी तयार होताना दिसत आहे.

Middle East War : ‘…तर तुम्ही मुस्लिम नाही’ ; इस्लामिक देशांच्या मौनावर इराण आक्रमक, दिला गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया खरंच इराणला गुप्तपणे सॅटेलाइटची माहिती देत आहे का?

    Ans: काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांमध्ये दावा केला जात आहे की, इराणच्या या अचूक हल्ल्यांमागे रशियाची सॅटेलाइट इंटेलिजेंसची शक्ती आहे. परंतु याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

  • Que: इराण हल्ले इतके अचूक कसे करत आहेत?

    Ans: वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, रशिया आपल्या प्रगत सॅटेलाइट नेटवर्कद्वारे इराणला अमेरिकी युद्धनौका आणि लष्करी तळांचे अचूक लोकेशन पोहचवत आहे. या रिअल-टाइम डेटाच्या मदतीने इराण अचूकपणे अमेरिकेवर हल्ला करत आहे.

Web Title: Middle east war russia helping iran with us military base intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • China
  • Iran News
  • Russia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.