Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Gaza News : गाझा मदतकर्त्यांसोबत इस्रायलचे अमानुष कृत्य; जगभरातून तीव्र निषेध, VIDEO

Israel Gaza News : इस्रालच्या एका कृत्याने पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यांनी गाझा मदत कार्यकर्त्यांसोबत अमानुष वागणूक केली आहे. ज्यामुळे जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील स्वत: मंत्र्यांनी शेअर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 10:33 AM
Israel Gaza News

Israel Gaza News

Follow Us
Follow Us:
  • गाझा मदतकर्त्यांसोबत इस्रायलचे अमानुष कृत्याने जगभरात खळबळ
  • इटलीच्या मेलोनींनी केला संताप व्यक्त
  • धक्कादायक व्हिडिओ समोर
Israel Gaza News in Marathi : जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्विर यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गाझाला मदत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना इस्रायलने ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जात आहे. त्यांची थट्टा उडवली जात आहे. या दृश्याने सर्वत्र खळबळ उडाली असून इटलीटच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Gaza Elections : गाझात नवा सुर्योदय! तब्बल २० वर्षानंतर पार पडले मतदान; लोकशाहीचा उदय होणार?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अशदोद बंदरावर गाझा फ्लोटिला अभियानातील आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्यांना इस्रायलने ताब्यात घेतले होते. यावेळी या कार्यकर्त्यांना जमिनीवर गुडघ्यांवर बसवून त्यांना हात बांधण्यात आले. या आंदोलकांची अत्यंत क्रूरपणे थट्टा उडवण्यात आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या कृत्याचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे.

इटलीच्या पंतप्रधान संतापल्या

दरम्यान या प्रकरणावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी इस्रायलच्या या कृत्याचा निषेध केला असून हे मानवीअधिकारांचे पूर्णपणे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या नागरिकांमध्ये एका इटलीच्या खासदाराचा आणि पत्रकाराचा समावेश आहे. यांच्या तातत्काळ सुटकेची मागणी इटली सरकारने केली आहे. तसेच या गैरवर्तनाबद्दल मेलोनी यांनी इस्रायलकजे जाहीर माफीनाम्याची मागणीही केली आहे. या प्रकरणी तातडीने स्पष्टीकरण देण्याचे सांगण्यात आले आहे.

व्हिडिओथ काय?

व्हिडिओच्या सुरुवातील एका महिला आंदोलकाला जबरदस्तीने जमिनीवर पाडण्यात आले. सुरक्षा रक्षकांनी तिचे डोके पकडून जमीवर दाबले आणि तिला बाजूला खेचले. केंद्रात आणखी काही लोकांना अशाच प्रकार मान खाली घालून बसवण्यात आले आहे. यांनतर मंत्री बेन ग्विर यांनी हसत इस्रायली झेंडा फडवला. हिब्रू भाषेत त्यांनी इस्रायलमध्ये तुमचे स्वागत आहे, येथे आमचीच सत्ता आहे असे आनंदात म्हटले.

जागतिक स्तरावर इस्रायलचा निषेध

सध्या इस्रालच्या या अमानुष कृत्याचा जागतिक स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी या कृत्याची तीव्र निंदा केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना तातडीने सोडण्याची मागणीही केली आहे. याशिवाय इचली, स्पेन, आयर्लंड आणि दक्षिण कोरियाने देखील यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, अद्याप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे यावर कोणतेही विधान आलेले नाही. राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्याच्या या कृत्याने इस्रायलची जागतिक स्तरावर नाच्चकी झाली आहे.

ככה אנחנו מקבלים את תומכי הטרור Welcome to Israel 🇮🇱 pic.twitter.com/7Hf8cAg7fC — איתמר בן גביר (@itamarbengvir) May 20, 2026

भारताने आंतरराष्ट्रीय कायदा मोडला? इस्रायलशी संबंधावरुन UN च्या विशेष दूतांचे गंभीर आरोप

Web Title: Minister itamar ben gvir taunt gaza activists global outrage israel gaza news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Khamenei Funeral : खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी; ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे 
1

Khamenei Funeral : खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी; ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे 

Trump-Netanyahu Meet : ‘त्यांना माहितीय, Boss कोण आहे’ ; नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान 
2

Trump-Netanyahu Meet : ‘त्यांना माहितीय, Boss कोण आहे’ ; नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान 

PM Modi Threat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी PM मोदींना जीवे मारण्याची धमकी? मेलबर्नमधील कार्यक्रमात घातपाताची शक्यता, तपास सुरु
3

PM Modi Threat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी PM मोदींना जीवे मारण्याची धमकी? मेलबर्नमधील कार्यक्रमात घातपाताची शक्यता, तपास सुरु

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृतांचा आकडा २,६०० च्या पार ; सततच्या  ‘आफ्टरशॉक्स’मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृतांचा आकडा २,६०० च्या पार ; सततच्या  ‘आफ्टरशॉक्स’मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.