भारताने आंतरराष्ट्रीय कायदा मोडला? इस्रायलशी संबंधावरुन UN च्या विशेष दूतांचे गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फ्रान्सेस्का अल्बानीज यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले की, इस्रायलकडून गाझात केल्या जाणाऱ्या अमानवीय कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ सतत नाही. या हल्ल्यांबाबत जगाने अत्यंत उदासीन भूमिका का स्वीकतारली आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २३ मार्च २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत फ्रान्सेस्का यांनी छळ आणि नरसंहार असा अहवाला सादर केला होता.
या अहवालात त्यांनी इस्रायलकडून २०२३ पासून केल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनींच्या अटकेबाबत आणि छळाबाबत सविस्तरपणे मांडले आहे.या अहवालानुसार इस्रायलने आतापर्यंत १८,५०० पॅलेस्टिनी नागरिकांना अट केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये १,५०० मुलांचाही समावेश आहे. महिला आणि मुलांचे शोषण, घरांतून उचलून नेणे आणि बॉम्बफेक करुन इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे अहवालात त्यांनी स्पष्ट केले आहे.
फ्रान्सेस्का यांनी भारताच्या इस्रायलशी असलेल्या संबंधावरही प्रश्न उपस्थित केले आहे. भारतावर नाराजी व्यक्त करत फ्रान्सेस्का यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे आणि असे असूनही भारत इस्रायलला मदत करत आहे. त्यांनी भारत इस्रायलला मदत करुन जागतिक नियमावलीला पायदळी तुडवत असल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की इस्रायलचे अस्तित्व अवघे ७०-७५ वर्षाचे आणि यामुळे त्यांच्याशी असलेल्या प्राचीन संबंध असल्याचा दावा चुकीचा आहे.
दरम्यान त्यांनी इस्रायलच्या गाझा(Gaza), लेबनॉनमधील कृत्यामुळे जागतिक व्यवस्थेला धक्का पोहचत असल्याचे त्यांनी म्हटले. यावर जगाने मौन बाळगणे या गुन्ह्यात सामील होण्यासारखेच आहे असेही त्या म्हणाल्या. यामुळे जगभरातील जनतेने आपल्या सरकारला जाब विचारला पाहिजे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
Ans: फ्रान्सस्का अल्बानीज यांच्या मते, इस्रायलवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध गुन्ह्यांचे आरोप असताना, पंतप्रधान नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट असताना संबंध ठेवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते.
Ans: २३ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या या अहवालात, ऑक्टोबर २०२३ पासून गाझात इस्रायलने केलेल्या कारवायांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Ans: अल्बानीज यांनी, इटलीच्या जनतेप्रमाणे भारतीय जनतेनेही सरकार कोणतीही भीती न बाळगता प्रश्न विचारण्याचे आवाहन केले आहे. भारताने जागतिक नियमांचे पालन करावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.






