Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी जागतिक माध्यमांमध्ये VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग

Modi Meloni meeting : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी व्यापार

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 24, 2025 | 11:41 AM
Modi-Meloni duo in the news again at G20 Trade AI and strategic cooperation gain momentum

Modi-Meloni duo in the news again at G20 Trade AI and strategic cooperation gain momentum

Follow Us
Close
Follow Us:
  • जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची तिसऱ्यांदा भेट.
  • दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, दहशतवादविरोध, एआय आणि धोरणात्मक सहकार्यासंबंधी चर्चा.
  • २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या एआय समिटला मेलोनींचा पूर्ण पाठिंबा; भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

Modi Meloni meeting : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या G-20 शिखर परिषदेत (G20 Johannesburg) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांची भेट पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी उबदार हस्तांदोलन आणि स्मितहास्याने संवादाची सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांत मोदी आणि मेलोनी यांच्यात घडणाऱ्या भेटींच्या मालिकेमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध एका नवीन उंचीवर पोहोचत असल्याचे दिसत आहे.

या वर्षातील ही दोन्ही नेत्यांची तिसरी अधिकृत भेट आहे. या भेटीत व्यापार, गुंतवणूक, विज्ञान-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), शिक्षण, दहशतवादविरोधी सहकार्य तसेच सुरक्षा क्षेत्रातील वाढती भागीदारी या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल देखील या बैठकीला उपस्थित होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

भारत आणि इटलीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा आढावा घेताना दोन्ही देशांनी २०२५–२०२९ या कालावधीसाठी संयुक्त धोरणात्मक सहकार योजनेची तयारी सुरू असल्याची पुष्टी केली. या योजनांमुळे व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि एआय क्षेत्रात नव्या करारांची शक्यता वाढणार आहे. आकडेवारीनुसार, २०२३–२४ मध्ये भारत-इटली व्यापार १५ अब्ज डॉलर्सच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतो. तसेच, वर्ष २००० पासून इटलीकडून भारतात ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या भेटीमध्ये २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या एआय समिटला जॉर्जिया मेलोनी यांनी संपूर्ण समर्थन जाहीर केले. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वेगाने वाढणारे संशोधन आणि बदलता जागतिक नकाशा लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

PM @narendramodi met PM @GiorgiaMeloni on the sidelines of G20 summit in Johannesburg, South Africa. Their talks centred around deepening 🇮🇳-🇮🇹 ties in trade, investment, technology, AI, defence and security, space, research, innovation and culture. Both leaders expressed… pic.twitter.com/SQfFok66LQ — Randhir Jaiswal (@MEAIndia) November 23, 2025

credit : social media

जागतिक राजकीय तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही नेत्यांची मैत्री आणि संवाद विशेष चर्चेत असते. G-20 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाले. त्या फोटोमध्ये त्या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसत होत्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर ‘Namansh Syal’ यांच्या सन्मानार्थ US ‘F-16’ टीमने रद्द केले डेमो उड्डाण

आधीपासूनच या दोन्ही नेत्यांची मैत्री जगभर चर्चेत आहे. कॅनडामध्ये जून २०२५ मध्ये झालेल्या G-7 परिषदेत आणि दुबईतील COP28 बैठकित दोघांचा सेल्फी चर्चेत राहिला होता. COP28 च्या पोस्टमध्ये मेलोनी यांनी लिहिले होते “Good friends at COP28.” या भेटीमुळे भारत–इटली संबंध अधिक दृढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. जागतिक धोरणात्मक संतुलन, भविष्यातील तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्याच्या संदर्भात ही बैठक निर्णायक ठरू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जी–२० मध्ये मोदी आणि मेलोनी का भेटले?

    Ans: द्विपक्षीय व्यापार, एआय आणि धोरणात्मक सहकार्यासाठी.

  • Que: दोन्ही देशांमधील व्यापार किती आहे?

    Ans: अंदाजे १५ अब्ज डॉलर्स (२०२३–२४).

  • Que: पुढील मोठा कार्यक्रम कोणता?

    Ans: २०२६ मध्ये भारतातील एआय समिट, ज्याला इटलीने समर्थन दिले आहे.

Web Title: Modi meloni duo in the news again at g20 trade ai and strategic cooperation gain momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • International Political news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
1

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश
2

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश

Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ
3

Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO
4

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.