Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारला अटक करत नाही आणि वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2026 | 05:37 PM
ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : काँग्रेस व इंडिया आघाडीने वोट चोरीचा मुद्दा मांडत देशभर आंदोलन सुरु केले आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेला हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले असून, ३० हजारांच्यावर पोलीसांचा फौजफाटा आहे. दिल्लीला येणाऱ्या २५० रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत तर मेट्रोही बंद करण्यात आलेली आहे. आंदोलन दडपून वोट चोरी लपवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारला अटक करत नाही आणि वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

दिल्लीतील लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्रातून प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मा. खा. हुसेन दलवाई, AICC सचिव B.M. संदीप, रेहाना चिश्ती, आमदार भाई जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह राज्यातील नेते व आमदार उपस्थित यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या मदतीने भाजपाने वोट चोरी केली आहे. SIR च्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. ज्ञानेश कुमारांचे कृत्य देशद्रोहाचे आहे, या वोटचोरीत ते कठपुतली आहेत आणि खरे सुत्रधार रंगा बिल्ला आहेत. लोकशाहीमध्ये निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक व्हायला हव्यात पण ज्ञानेशकुमारांनी त्याला बगल दिली आहे. देशातील हुकूमशाही शक्तीच्या विरोधात हा लढा असून लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची गरज आहे.

दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून काँग्रेसचे सर्व आमदार, माजी आमदार-खासदार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जवळपास हजार कार्यकर्ते आले आहेत. हे आंदोलन फक्त दिल्लीतच सुरु नाही तर गल्ली ते दिल्ली आंदोलन सुरु आहे. इंडिया आघाडीचे नेते आज सरन्यायाधिशांना भेटणार होते, न्यायालयाने वेळ दिल्याचे समजले पण नंतर त्यांनी भेटण्यास नकार दिला, हे काय गौडबंगाल आहे ते समजायला हवे असे सपकाळ म्हणाले.

मुंबईतही वोटचोरीविरुद्ध आंदोलन

दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटला असताना मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आंदोलन केले. दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य निडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, भाजपा आणि मोदी-शाह यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, संदेश कोंडविलकर, गुरुमितसिंग बच्छर, दिपक वाघमारे, राघवेंद्र शुक्ला, प्रशांत धुमाळ, दत्ता नांदे, संतोष राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून

MPSC घोटाळ्याची वेळेत चौकशी पूर्ण करा

MPSC चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले असून MPSC पेपरफुटीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली, याचाच अर्थ दाल में कुछ काला है. आता सरकारने सांगितल्याप्रमाणे विहित वेळत ही चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई करावी. पण भिमनवार यांची नियुक्तीच चुकीची होती. आपल्या विचारांच्या लोकांना प्रशासनात घुसवणे व पेपरफुटी दडपण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी भिमनवार यांची नियुक्ती केली होती. या सर्व प्रकरणामुळे एमपीएससीची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded the arrest of dnyanesh kumar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
1

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
2

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
3

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
4

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.