IAF : अमेरिका भारताच्या दुःखात सहभागी; विंग कमांडर 'Namansh Syal' यांच्या सन्मानार्थ US 'F-16' टीमने रद्द केले डेमो उड्डाण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Wing Commander Namansh Syal : दुबई एअर शो 2025 (Dubai Airshow) दरम्यान भारतीय हवाई दलाचे धाडसी पायलट विंग कमांडर नमांश सियाल(Namansh Syal) यांनी आपल्या कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान दिले. तेजस LCA Mk-1 डेमो फ्लाइट दरम्यान झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण भारतीय हवाई दल आणि देशभरातील नागरिकांना शोकात बुडवले.
३७ वर्षीय विंग कमांडर सियाल हे उत्कृष्ट प्रशिक्षण, विलक्षण आत्मविश्वास आणि अतुलनीय उड्डाण कौशल्यासाठी ओळखले जात होते. दुबई एअर शोच्या शेवटच्या दिवशी ते कमी उंचीवर अत्यंत गुंतागुंतीच्या ॲक्रोबॅटिक युद्धाभ्यासाची प्रात्यक्षिके करत असताना तेजस विमान अनियंत्रित झाले, जमिनीवर कोसळले आणि क्षणात त्याला आग लागली. हा अपघात एअरशोमधील सर्वांत दुःखद क्षण ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
या शोकांतिकेनंतर एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक पाऊल उचलण्यात आले. अमेरिकेच्या F-16 व्हायपर डेमोन्स्ट्रेशन टीमने २१ नोव्हेंबर रोजी होणारे त्यांचे अंतिम हवाई प्रात्यक्षिक तत्काळ रद्द केले. या निर्णयाची माहिती टीमचे कमांडर मेजर टेलर फामा हेस्टर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टद्वारे दिली.
त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “एखाद्या पायलटचे जीवन संपल्यानंतर काही क्षणातच रॉक अँड रोल म्युझिक आणि आनंदी घोषणा सुरू राहणे धक्कादायक होते.” हेस्टर यांनी पुढे सांगितले की, अपघातानंतर त्यांनी दूरून त्या जागेला पाहिले रिकाम्या पार्किंगजवळ उभे भारतीय तांत्रिक कर्मचारी, पडलेली शिडी, आणि शहीद विंग कमांडरचे सामान अद्याप त्यांच्या भाड्याच्या कारमध्येच होते.
मेजर हेस्टर यांनी आयोजकांनी शो सुरूच ठेवण्याचा घेतलेला निर्णय ‘अवास्तव’ आणि ‘भावनिकदृष्ट्या कठीण’ असल्याचे लिहिले. त्यांनी नमूद केले:
“लोक म्हणतात शो थांबू नये. पण काही क्षण असे असतात जेव्हा थांबणेच सर्वात जास्त आवश्यक असते.”
US aerobatic pilot Taylor “FEMA” Hiester & his F-16 Viper Demo Team canceled their Dubai Airshow performance out of respect after Indian Wing Commander Namansh Syal who died in Tejas Crash. Shares emotional statement on Insta: pic.twitter.com/7ubudyTXeS — Sidhant Sibal (@sidhant) November 23, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Osaka Consul : चीन- जपान युद्ध जगाच्या उंबरठ्याशी; ‘शीर कापण्याची’ धमकी संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचली, जगभरात खळबळ
विंग कमांडर सियाल यांच्या पश्चात त्यांची पत्नी भारतीय हवाई दलातीलच विंग कमांडर अफशान अख्तर, त्यांची सहा वर्षांची मुलगी आणि त्यांचे आई-वडील आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन या अपघाताने उद्ध्वस्त झाले असून, भारतीय हवाई दलाने त्यांच्या शौर्य आणि समर्पणाला सर्वोच्च श्रद्धांजली अर्पण केली आहे. तेजस विमानाचे हे दुसरे मोठे अपघात असून, या घटनेने भारताच्या स्वदेशी डिफेन्स तंत्रज्ञान आणि सुरक्षेबाबत चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. आज विंग कमांडर नमांश सियाल यांचे नाव केवळ भारतीय हवाई दलापुरते मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही धैर्याचे प्रतीक बनले आहे.
Ans: दुबई एअर शो दरम्यान तेजस LCA डेमो फ्लाइट दरम्यान अपघातात ते शहीद झाले.
Ans: विंग कमांडर सियाल यांच्या सन्मानार्थ आणि या शोकांतिकेच्या आदरार्थ डेमो रद्द करण्यात आला.
Ans: त्यांची पत्नी, सहा वर्षांची मुलगी आणि कुटुंब आहे.






