More Than 20,000 Indians lost their lives in terrorist attacks, India Blasts Pakistan At UN
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. दिवसेंदिवस हा तणाव वाढत चालला आहे. दरम्यान शनिवारी दहशतवादला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये खरा चेहरा उघड झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर अनेक खोटे आरोप केले आहे. या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकता नाही या विधानाच्या अनुषंगाने भारताने संयुक्त राष्ट्रांत सिंधू जल करारावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताने पाकिस्तानवप कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानने भारतविरोधी युद्ध पुकारले आणि हजारो दहशतवादी हल्ले केल्याचे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानचे आरोप, दावे, आणि खोटे प्रचार फेटाळून लावले आहेत. सिंधू जल करारावर भारताने ” आम्ही आमच्या नागरिकांचे रक्त सांडणाऱ्याला पाणी देऊ शकत नाही, असे स्पष्ट आणि ठोस शब्दात सांगितले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात भूमिका घेतली होती. भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. यानंतर पाकिस्तान तिथर बिथर झाला होता. चवथाळलेल्या अवस्थेत पाकिस्तानने सिंधू जल करारावर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पाकिस्तानी मंत्र्यांनी धमक्याही दिल्या होत्या. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या प्रत्येत चुकीच्या माहिती आणि धमक्यांना कडाडून उत्तर दिले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारत एक अपस्ट्रीम देश आहे, भारत नेहमीच जबाबदारीने वागत आला आहे आणि राहील.
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने स्पष्ट केले की, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार सद्भावना आणि मैत्रीच्या आधारावर स्वीकाकला होता. परंतु पाकिस्तानने अनेक वेळा कराराचे उल्लंघन केले. या ६५ वर्षांच्या काळात भारतावर अनेक दहशतवादी हल्ले पाकिस्तानकडून केले गेले. यामध्ये २० हजारांहून अधिक निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. तसेच भारताने संयुक्त राष्ट्रांत नुकताच झालेल्या पहलगाम दहशतवादी भ्याड दहशतवादी हल्ल्यावर भर दिला.
दरम्यान या वेळी भारताने कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. भारताचे राजदूत पी. हरीश यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ले नाहीत भारताच्या विविध प्रकल्पांना ही लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. यामुळे भारताच्या उर्जा उत्पादन आणि हवामान बदलांवर गंभीर परिणाम झाल्याचे हरीश यांनी सांगितले. २०१२ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या तुळबुल मधील जलविद्युत प्रकल्पावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
दरम्यान राजदूत पी. हरीश यांनी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही हे मान्य करणे कठीण असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतासाठी पाकिस्तान एक गंभीर धोका आहे. यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना आसरा देणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील असे भारताने म्हटले आहे.