जर्मनीत मोठी दुर्घटना! हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर लोकांवर हल्ला ; अनेकजण जखमी, संशयिताला अटक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बर्लिन: जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर एक दुर्घटना घडली आहे. एका अज्ञात हल्लेखोराने लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. शुक्रवारी २३ मे रोजी ही घटना घडली.
हॅम्बुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे, तर इतर लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. दरम्यामन पोलिसांनी ३९ वर्षीय संशयिताला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराने हा हल्ला एकट्याने घडवून असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांने स्टेशनवरीलव ट्रॅक १३ आणि १४ प्लॅटफॉर्मवरील लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यातील जखमींची संख्या अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्टनुसार, किमान १२ जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृची गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.
🚨 KNIFE ATTACK IN HAMBURG
A knife-wielding woman went on a bloody rampage at Hamburg Central Station Friday evening – leaving 12 people stabbed, three now fighting for their lives.
The attack struck during rush hour. Chaos erupted on platform 13/14. Blood stained the ground.… pic.twitter.com/UvjFmrdlqd
— Amy Mek (@AmyMek) May 23, 2025
हॅम्बुर्ग हे जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हॅम्बुर्ग स्थानिक, प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी प्रमुख ठिकाण आहे. स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ६ नंतर हा हल्ला झाला. या घटनेनंतर पोलिसांना प्लॅटफॉर्मवर हाय अलर्ट जारी केला आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळीच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आणि पोलिसांच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहान केले आहे. पोलिसांना या घटनेचा तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी सांगतिले की, स्टेशनवर अनेक लोकांवर अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. यामध्ये अनेक लोक गंभीर जखणी झाले. संशियताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने स्टेशनच्या १३ आणि १४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील लोकांना लक्ष्य केले.