म्यानमारमधील 5000 हून अधिक लोक भारतीय सीमेत घुसले ; 39 लष्करी जवानांचाही समावेश

म्यानमारमधील सत्ताधारी जंटा आणि मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स यांच्या समर्थनाखालील सुरक्षा दलांच्या गोळीबारामुळे लोक भारतीय सीमेत घुसत आहेत.

  म्यानमारच्या चिन राज्यात हवाई हल्ले आणि गोळीबारामुळे सीमावर्ती भागात तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. सर्वसामान्य नागरिक घाबरून भारतात प्रवेश करत आहेत. मिझोरम पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 24 तासांत 5000 हून अधिक लोक भारतीय हद्दीत घुसले आहेत. त्यात 39 लष्करी जवानही आहेत.

  वृत्तसंस्था एएनआयने आयजीपी लालबियाकथांगा खिआंगटेच्या हवाल्याने सांगितले की, रविवारी (१२ नोव्हेंबर) संध्याकाळी म्यानमारच्या पीडीएफने म्यानमार आर्मी पोस्टवर हल्ला केला. काल (सोमवार, 13 नोव्हेंबर) PDF ने म्यानमारच्या दोन पोस्ट कॅप्चर केल्या. त्याचा परिणाम असा झाला की म्यानमारच्या लष्करी जवानांनी मिझोराममध्ये आश्रय घेण्यास सुरुवात केली. यापैकी ३९ जणांनी मिझोरम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

  आयजीपी पुढे म्हणाले, “सीमेजवळील दोन गावांमध्ये ५,००० हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आणि आमचे सुमारे २० नागरिक जखमी झाले. यातील आठ जणांना चांगल्या उपचारासाठी आयझॉल येथे आणण्यात आले आहे. काल संध्याकाळी गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला. सध्या खूप शांतता आहे, पण म्यानमारचे सैन्य हवाई हल्ले करणार की नाही हे आम्हाला माहीत नाही. आम्ही यावेळी हवाई हल्ल्याची शक्यता नाकारू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

  PDF कोण आहे?
  वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना मिझोरामच्या चंफई जिल्ह्याचे उपायुक्त (डीसी) जेम्स लालरिंचना यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी म्यानमारमधील सत्ताधारी जंटा आणि मिलिशिया ग्रुप ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ यांच्या समर्थनाखालील सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाला. ‘ (पीडीएफ). चंफई जिल्ह्याची सीमा शेजारील देशाच्या चिन राज्याशी आहे.

  ते म्हणाले की पीडीएफने भारतीय सीमेजवळील चिन राज्यातील खवामावी आणि रिखावदार येथील दोन लष्करी स्थानांवर हल्ला केल्यावर लढाई सुरू झाली.