वाशीतील विष्णुदास भावे येथे आयोजित जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार टीका करत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. 2200 कोटी रुपयांच्या उधळपट्टीवर प्रश्न उपस्थित करत कामगारांच्या हितासाठी झालेल्या 125 कोटींच्या खर्चाचे समर्थन केले. कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा 58 वरून 60 वर्षे करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच 2011 पूर्वी बांधलेल्या 1500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांवर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देत नागरिकांना दिलासा दिला. या दरम्यान, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.