महानगरपालिकेच्या सन 2026–2027 च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अनंत नवानाथ गायकवाड यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.बैठकीत शहरातील आरोग्य सुविधांचा विचार करून नवीन रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नव्याने विकसित होत असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील संवेदशील भागामध्ये व लातूर शहराच्या मुख्य चौकामध्ये ए आय च्या माध्यमातून CCTV कॅमेरे बसविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.तसेच शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार स्मशानभूमीच्या जागा व सुविधांचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व हरित पट्ट्यांचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी अतिरिक्त निधी देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.