Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

mRNA vaccine cancer : रशियाची मोठी घोषणा कॅन्सरवर प्रभावी ठरणारी लस लवकरच बाजारात आणणार; वापरासाठी सज्ज

Russia News: रशियन शास्त्रज्ञांनी mRNA-आधारित कर्करोग लस विकसित केली आहे, जी प्री-क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे आणि आता क्लिनिकल वापरासाठी तयार आहे, असे FMBA प्रमुखांनी सांगितले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 07, 2025 | 10:11 PM
mrna vaccine cancer russia breakthrough cancer vaccine ready for use

mrna vaccine cancer russia breakthrough cancer vaccine ready for use

Follow Us
Close
Follow Us:

mRNA vaccine cancer : जगभरातील लाखो रुग्णांना वर्षानुवर्षे छळणाऱ्या कर्करोगाविरुद्ध आता आशेचा नवा किरण दिसत आहे. रशियाच्या शास्त्रज्ञांनी mRNA-आधारित कर्करोग लस विकसित केल्याचा दावा केला असून, ही लस क्लिनिकल वापरासाठी सज्ज असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. रशियाची फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) हिने याबाबत मोठी घोषणा केली आहे. FMBA च्या प्रमुख वेरोनिका स्कव्होर्त्सोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीने प्री-क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या लसीची काटेकोर तपासणी करण्यात आली आणि सुरक्षितता तसेच परिणामकारकतेच्या दृष्टीने समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत.

 लस कशी कार्य करते?

ही लस खास mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक आरएनए प्रोफाइलनुसार ती कस्टमाइज केली जाईल. म्हणजेच प्रत्येक रुग्णासाठी ही लस वैयक्तिक पातळीवर तयार केली जाणार आहे, ज्यामुळे त्याचा परिणाम अधिक प्रभावी होईल. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, ही लस ट्यूमरचा आकार ६०% ते ८०% पर्यंत कमी करण्यात यशस्वी ठरली आहे. एवढेच नव्हे तर ट्यूमरची वाढ मंदावण्यातही ती सक्षम ठरली आहे. हे निष्कर्ष कर्करोग संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक मानले जात आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iryna Zartuska : अमेरिकेत युक्रेनियन निर्वासित इरीना जरतुस्का हत्येमुळे वाद; सुरक्षिततेसाठी आलेल्या भूमीवरच तिचा दुर्दैवी अंत

 सुरक्षितता आणि वारंवार वापर

रुग्णांसाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्कव्होर्त्सोवा यांनी स्पष्ट केले. वारंवार वापरूनही त्यात कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. हे वैशिष्ट्य कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचारांना नवे युग देऊ शकते.

सध्या कोणत्या कर्करोगांसाठी?

सुरुवातीला ही लस कोलोरेक्टल कर्करोग (आंत्राचा कर्करोग) रुग्णांसाठी विकसित करण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी ग्लिओब्लास्टोमा (मेंदूचा कर्करोग) आणि मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) यांच्यासाठीही लस तयार करण्याचे संशोधन सुरू आहे आणि ते आता प्रगत अवस्थेत आहे.

 पुढील टप्पा : मंजुरीची प्रतीक्षा

FMBA ने यावर्षीच्या उन्हाळ्यातच रशियन आरोग्य मंत्रालयाकडे या लसीच्या मंजुरीसाठी अर्ज सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ती रुग्णांच्या प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल. मात्र, ही लस रशियाबाहेर इतर देशांमध्ये कधी उपलब्ध होईल, याबद्दल अद्याप निश्चित माहिती दिलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balochistan Blackout : बलुचिस्तानमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इंटरनेट बंद; काहीतरी मोठी योजना आखत आहे मुनीर सेना?

 जागतिक आरोग्यासाठी मोठे पाऊल

जगभरातील लाखो कर्करोग रुग्णांसाठी ही लस आशेचा नवा किरण ठरू शकते. आतापर्यंत कर्करोगाच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन या पद्धती वापरल्या जात होत्या. त्यात रुग्णाला तीव्र वेदना, दुष्परिणाम आणि मानसिक तणाव सहन करावा लागत होता. मात्र, ही नवी लस त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि क्रांतिकारी ठरू शकते. वैज्ञानिकांच्या मते, जर या लसीला लवकरच मंजुरी मिळाली, तर कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल. ही लस रुग्णाला जीवनदान देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Mrna vaccine cancer russia breakthrough cancer vaccine ready for use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:11 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer prevention
  • Free Vaccination
  • Russia

संबंधित बातम्या

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी
1

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी

Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची आहे 7 धोकादायक लक्षणं, हाडांच्या कर्करोगाबाबत डॉक्टरांनी केला खुलासा
2

Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची आहे 7 धोकादायक लक्षणं, हाडांच्या कर्करोगाबाबत डॉक्टरांनी केला खुलासा

Russian Threat: सांताक्लॉजच्या घरात NATO सैनिक तैनात! रशियाचा काटा काढण्यासाठी डावपेचात्मक हालचाल; रोव्हानिएमीमध्ये चाणाक्ष डाव
3

Russian Threat: सांताक्लॉजच्या घरात NATO सैनिक तैनात! रशियाचा काटा काढण्यासाठी डावपेचात्मक हालचाल; रोव्हानिएमीमध्ये चाणाक्ष डाव

मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO
4

मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.