Muhammad Yunus goverment statement after India imposes restrictions on bangladeshi Goods
ढाका: भारत आणि बांगलादेशमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापरावरही दिसून येत आहे. भारताने एक मोठा निर्णय घेत बांगलादेशला धक्का दिला होता. भारताने बांगलादेशी वस्तूंच्या आयातींवर निर्बंध लादले होते. याचा मोठा फटका बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. भारताच्या या निर्णयामागे बांगलादेशच्या सध्याच्या सरकार मोहम्मद युनूस यांनी भारताविरोधी केलेली कारस्थाने आहेत. यामुळे भारताने जशाच तसे धोरण राबवत बांगलादेशवर निर्बंध लादले आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.
भारताच्या या निर्णयानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतिरम सरकाचे सल्लागार शेख बरशीरुद्दीन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले की, भारताकडून अद्याप व्यापर निर्बंधावर कोणतीही अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही. अधिकृत माहिती आल्यावर आम्ही यावर योग्य ती कारवाई करु. तसेच कोणत्या समस्या आल्या तर दोन्ही देसांकडून त्यावर स्पष्ट चर्चा होईल. बांगलदेश भारताशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारताचे आता जशास तसे धोरण…’ युनूस सरकारला लवकरच येणार प्रचिती
मीडिया रिपोर्टनुसार, भारताने बांगलादेशातून रस्ता मार्गाने येणाऱ्या कपड्यांवर, फळांवर, तसेच फळांच्या पेयावर, कार्बोनेटेड पेयावर, स्नॅक्स, चिप्स, मिठाई, याशिवाय कापूस आणि कापसाच्या धाग्याच्या वस्तू, प्लॅस्टिक आणि पीव्हीसी वस्तू, लाकडी फर्निचर या सर्व वस्तूंच्या आयातींवर भारताने निर्बंध लादले आहे. तसेच बांगालदेशने भारतातून सूत आयात करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
बारत सरकारने शत्रू देशांच्या चालींना उत्तर देण्यासाठी जशाच तसे धोरण अवलंबवले आहे. याअंतर्गत भारताने तुर्की आणि अझरबैजानवरही कारवाई केली आहे. भारताने तुर्की आणि अझरबैजानच्या पर्यटन आणि व्यापारावर निर्बंध लादले आहे. यामुळे आता या देशांना आपल्या धोरणांचा विचार करावा लागले. भारताच्या या कारवाईने बांगलादेशला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे तुर्की आणि अझरबैजानला देखील स्पष्ट संदेश मिळाला आहे.
दरम्यान भारत आणि बांगलादेशमधील व्यापार थांंबला तर याचा काही परिणाम भारतीय बाजारपेठांवरही दिसून येण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे निर्बंध लादलेल्या वस्तूंच्या पुरवठा कमी होईल आणि वस्तूंच्या किमतीत वाढ होईल. दरम्यान बांगलादेशने यावर स्पष्ट चर्चा करम्यास तयारी दर्शवली आहे. आता भारत सरकारची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.