Mumbai to Dubai High Speed Rail Link Fast Travel in 2 Hours projects
मुंबई : आपल्या देशातून परदेश वारी करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये दुबईला जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. फिरण्यासाठी आणि कामासाठी अनेकजण दुबईला जात असतात. आता मात्र मुंबई ते दुबई असा प्रवास केवळ दोन तासांमध्ये करणे शक्य होणार आहे. हे केवळ स्वप्न किंवा गप्पा नसून ही गोष्ट खरी आहे. हाय-स्पीड रेल्वे लिंकने दुबई ते मुंबई असा प्रवास केवळ 2 तासांमध्ये करण्यात येणार आहे. याचप्रवास हा प्रवास विमानामधून आकाशातून किंवा जमिनीवरुन नाही तर चक्क पाण्याखालून होणार आहे.
यूएई नॅशनल कन्सल्टन्सी ब्युरो लिमिटेडकडून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेनुसार, दुबई आणि मुंबई दरम्यान एक पाण्याखालील रेल्वे लिंक प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील प्रवास वेळ फक्त दोन तासांपर्यंत कमी होईल. ही हाय-स्पीड ट्रेन ताशी 600 ते 1000 किमी वेगाने धावेल. हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आला होता, परंतु त्याच्या मंजुरी किंवा विकासाबाबत कोणतेही अपडेट समोर झालेले नाहीत. मात्र हा प्रकल्प साक्षात साकार झाल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक चालना मिळणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेडचे प्रतिनिधित्व करणारा दावा करणाऱ्या एका यूट्यूब अकाउंटने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये रेल्वे लिंक बांधल्यानंतर कशी दिसेल हे दाखवले आहे. तथापि, त्यांच्या अवघड अशा अभियांत्रिकी डिझाईन, गरज आणि आवश्यकतांमुळे हा मोठा खर्चीक प्रकल्प असणार आहे. दुबई ते मुंबई या पाण्याखालील प्रवाशाच्या या प्रकल्पात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रकल्प तयार होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मुंबई ते दुबई दरम्यान प्रवास करण्यासाठी विमान सेवा उपलब्ध आहे. या विमान प्रवासाचा वेळ ३ तास १५ मिनिटे आहे, तर या रेल्वे लिंकला फक्त २ तास लागणार आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील कच्च्या तेलासह वस्तूंची वाहतूक अधिक सोयीस्कर होईल. २०३० पर्यंत कामकाज सुरू करण्याचे लक्ष्य आहे. तथापि, मंजुरी आणि आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. यामुळे दोन्ही देशांमधील अर्थिक, शैक्षणिक देवणघेवाण करण्यास सोपे पडणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई आणि दुबईमधील विमानाने जाण्यासाठी लागणारे हवाई अंतर अंदाजे 1,958 किलोमीटर आहे. दोन्ही देशांमधील रस्त्याने अंतर सुमारे 6,628 किलोमीटर (४,११८ मैल) आहे. हे अंतर गाडीने पार करण्यासाठी सुमारे 03 दिवस आणि 11 तास लागतात, तर दोन्ही देशांमधील जलमार्ग (समुद्री अंतर) सुमारे 1,172 नॉटिकल मैल (2,170 किलोमीटर) आहे.
जर प्रस्ताव मंजूर झाला तर रेल्वे लिंक 2030 पर्यंत पूर्ण होऊ शकेल. भारत आणि युएई दरम्यान व्यापार आणि वाहतूक कार्यक्षमता सुधारण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाचे आहे. दोन्ही शहरांमध्ये प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या हवाई प्रवासाला पर्याय म्हणून पाण्याखालील रेल्वे लिंककडे पाहिले जात आहे. यामुळे भारत आणि युएई दरम्यान कच्च्या तेलासह वस्तूंची वाहतूक सुलभ होऊ शकते, ज्यामुळे व्यापारी संबंध मजबूत होण्यास मदत होईल.