नासाच्या अंतराळवीरांनी चंद्रावरून पाठवली आहेत पृथ्वीची अप्रतिम छायाचित्रे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
NASA Artemis 2 Earth photos from Moon : मानवाच्या अंतराळ संशोधनातील सर्वात गौरवशाली क्षण आज पुन्हा एकदा प्रत्यक्षात आला आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर, जेव्हा नासाचे ‘आर्टेमिस २'(NASA Artemis 2) मोहिमेतील चार धाडसी अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावले, तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांना दिसले आपल्या घराचे म्हणजेच ‘पृथ्वी’चे एक विलोभनीय दृश्य. नासाने आता ही पहिली छायाचित्रे अधिकृतपणे प्रसिद्ध केली असून, ती पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. कमांडर रीड वाईजमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवर टिपलेली ही छायाचित्रे म्हणजे विज्ञानाचा चमत्कारच म्हणावा लागेल.
नासाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या प्रतिमेत, सूर्य पृथ्वीच्या मागे मावळताना दिसत आहे. या ‘कॉस्मिक’ सूर्यास्ताच्या प्रकाशात पृथ्वीच्या काठावर निळसर आणि हिरव्या रंगाच्या ‘अरोरा’ (उत्तर ध्रुवीय प्रकाश) लहरी स्पष्टपणे दिसत आहेत. या फोटोंमध्ये केवळ पृथ्वीच नाही, तर अंतराळातील ‘राशिचक्र प्रकाशाचा’ (Zodiacal Light) एक तेजस्वी पट्टाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नासा मिशन कंट्रोलने हे फोटो शेअर करताना एक भावनिक संदेश दिला आहे “आपण अवकाशात कितीही दूर गेलो, तरी आपण सर्व एकच जग आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : A-10 Warthog : एका क्षेपणास्त्रात खेळ खल्लास! अमेरिकेच्या गर्विष्ठ ‘वॉरहॉग’ला इराणने क्षणात संपवले; VIDEO मीडियामध्ये लीक
दुसऱ्या प्रतिमेने विज्ञानाप्रेमींची मने जिंकली आहेत. अंतराळयानाचा शल्टर स्पीड कमी ठेवून काढलेल्या या फोटोमध्ये रात्रीच्या वेळी पृथ्वी कशी चमकते, हे स्पष्टपणे दिसत आहे. जगभरातील मोठ्या शहरांचे दिवे, विजेचा लखलखाट आणि ढगांच्या आडून दिसणारा भूभाग हे दृश्य अत्यंत नेत्रदीपक आहे. ‘ओरियन’ अवकाशयानाच्या छोट्याशा खिडकीतून दिसणारा हा ‘निळा ठिपका’ आपण निसर्गाच्या तुलनेत किती लहान आहोत, याची आठवण करून देतो.
1972 ➡️2026
Apollo 17 ➡️ Artemis II pic.twitter.com/wGc2wtY0e2 — NASA (@NASA) April 3, 2026
credit – social media and Twitter
या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना मिशन विशेषज्ञ क्रिस्टीना कोच म्हणाल्या, “संपूर्ण पृथ्वीला एकाच वेळी खिडकीत पाहणे हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. दिवसा उजळलेली धरती आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात न्हालेली पृथ्वी पाहून मन प्रसन्न होते.” कमांडर रीड वाईजमन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचे यान फिरले तेव्हा त्यांना युरोप आणि आफ्रिका खंड स्पष्टपणे दिसत होते. ते म्हणाले, “तो इतका प्रेक्षणीय क्षण होता की आम्ही चौघेही काही काळ स्तब्ध झालो होतो.”
Even in darkness, we glow. In this image of Earth taken by the Artemis II crew, we can see the electric lights of human activity. In the lower right, sunlight illuminates the limb of the planet. pic.twitter.com/kWcjHFvoDM — NASA (@NASA) April 3, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ancient Treasure: इंटरपोलचा ‘तो’ सर्वात मोठा शोध यशस्वी! 2500 वर्षे जुना सोन्याचा खजिना सापडला; नेदरलँड्समध्ये मोठा खुलासा
आर्टेमिस २ मोहीम ही मानवाला पुन्हा चंद्रावर उतरवण्याच्या नासाच्या मोठ्या ध्येयाचा एक भाग आहे. १९७२ नंतर प्रथमच मानवी डोळ्यांनी इतक्या जवळून चंद्राची कक्षा आणि इतक्या दुरून पृथ्वीचे पूर्ण गोलाकार स्वरूप पाहिले आहे. हे फोटो केवळ विज्ञानासाठी महत्त्वाचे नाहीत, तर ते पुढच्या पिढीला अंतराळ संशोधनासाठी प्रेरित करणारे ठरतील. हे फोटो सिद्ध करतात की मानवी जिद्द आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण अवकाशाची कोणतीही सीमा ओलांडू शकतो.
Ans: हे फोटो अंतराळवीरांनी चंद्राच्या दिशेने प्रवास करत असताना 'ओरियन' अवकाशयानाच्या खिडकीतून टिपले आहेत.
Ans: या फोटोंमध्ये पृथ्वीवरील अरोरा बोरेलिस (ध्रुवीय प्रकाश), सूर्यास्त आणि रात्रीच्या वेळी चमकणारे शहरांचे दिवे स्पष्टपणे दिसत आहेत.
Ans: मोहिमेचे कमांडर रीड वाईजमन यांनी त्यांच्या वैयक्तिक टॅबलेटवर हे ऐतिहासिक फोटो टिपले आहेत.






