Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…

Himanshi Khurana Case: कॅनडातील टोरंटो येथे 30 वर्षीय भारतीय नागरिक हिमांशी खुरानाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर अब्दुल गफूरीविरुद्ध फर्स्ट-डिग्री मर्डर वॉरंट जारी केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 24, 2025 | 12:18 PM
Nationwide manhunt for Himanshi Khurana’s boyfriend after suspected homicide in Toronto

Nationwide manhunt for Himanshi Khurana’s boyfriend after suspected homicide in Toronto

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडातील टोरंटोमध्ये ३० वर्षीय भारतीय तरुणी हिमांशी खुराणाची तिच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
  •  पोलिसांनी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफूरीविरुद्ध ‘फर्स्ट-डिग्री मर्डर’चे वॉरंट जारी केले असून तो सध्या फरार आहे.
  • टोरंटोमधील भारतीय दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून कॅनडा सरकारकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Himanshi Khurana murder case Toronto 2025 : कॅनडातील (Canada) टोरंटो शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. ३० वर्षीय भारतीय नागरिक हिमांशी खुराणा हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने केवळ कॅनडातील भारतीय समुदायच नाही, तर संपूर्ण भारत देश हादरला आहे. टोरंटो पोलिसांनी या हत्येप्रकरणी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफूरी याला मुख्य आरोपी ठरवले असून त्याच्या विरोधात संपूर्ण कॅनडात अटक वॉरंट जारी केले आहे. ही घटना ‘घरगुती हिंसाचाराचा’ एक भीषण प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बेपत्ता झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सापडला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशी खुराणा शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:४० च्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिला शेवटचे टोरंटोमधील स्ट्रॅचन अव्हेन्यू परिसरात पाहिले गेले होते. ती घरी न परतल्याने तिच्या निकटवर्तीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली, परंतु शनिवारी सकाळी ६:३० वाजता एका घरातून हिमांशीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ‘खून’ म्हणून सुरू केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?

मुख्य संशयित अब्दुल गफूरीचा शोध सुरू

तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. ३२ वर्षीय अब्दुल गफूरी आणि हिमांशी हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर हत्येत झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. अब्दुलविरुद्ध ‘फर्स्ट-डिग्री मर्डर’ (नियोजित हत्या) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून तो ‘धोकादायक’ असल्याचे नागरिकांना बजावले आहे.

TORONTO POLICE ASKING FOR INFORMATION ON ABDUL GHAFOORI ACCUSED OF MURDERING HIMANSHI KHURANA. Himanshi Khurana, 30, of Toronto has been identified as the victim in the city’s 40th homicide of 2025.
Toronto Police say Khurana was reported missing on Friday, Dec 19, around 10:41… pic.twitter.com/JgNv0EhIMG
— Rahul Shivshankar (@RShivshankar) December 24, 2025

credit : social media and Twitter

भारतीय दूतावासाचा शोक आणि संताप

टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “एका तरुण भारतीय मुलीची अशा प्रकारे झालेली हत्या अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही हिमांशीच्या कुटुंबासोबत आहोत आणि कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत.” दूतावासाने हिमांशीचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी कॅनडा सरकारवर दबाव वाढवला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’

कॅनडातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न

२०२५ सालात टोरंटोमध्ये झालेली ही ४० वी हत्या आहे. गेल्या काही महिन्यांत कॅनडामध्ये भारतीय नागरिक आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हिमांशी खुराणा ही एक ‘डिजिटल क्रिएटर’ म्हणून सोशल मीडियावर सक्रिय होती. तिच्या अशा अकाली निधनाने परदेशात स्थायिक होणाऱ्या तरुणांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिमांशी खुराणाची हत्या कोठे आणि कधी झाली?

    Ans: हिमांशी खुराणाची हत्या १९ डिसेंबर २०२५ रोजी कॅनडातील टोरंटो शहरात झाली. तिचा मृतदेह शनिवारी सकाळी एका घरात सापडला.

  • Que: या हत्येतील मुख्य संशयित कोण आहे?

    Ans: पोलिसांनी हिमांशीचा प्रियकर अब्दुल गफूरी (३२ वर्षे) याला मुख्य संशयित मानले असून त्याच्याविरुद्ध हत्येचे वॉरंट जारी केले आहे.

  • Que: भारतीय दूतावासाने यावर काय पावले उचलली आहेत?

    Ans: भारतीय वाणिज्य दूतावास कॅनेडियन पोलिसांच्या सतत संपर्कात असून पीडित कुटुंबाला कायदेशीर आणि पार्थिव भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे.

Web Title: Nationwide manhunt for himanshi khuranas boyfriend after suspected homicide in toronto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Canada
  • international news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’
1

Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL
2

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर…
3

धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर…

जागतिक नेत्यांच्या जीवाला लागलाय घोर; जेफ्री एपस्टाईनच्या फाईलने उलघडणार गुपित
4

जागतिक नेत्यांच्या जीवाला लागलाय घोर; जेफ्री एपस्टाईनच्या फाईलने उलघडणार गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.