Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

नेपाळमधील प्रसिद्ध सेतीबेनी येथील विशाल शालिग्राम शिळा पाण्याखाली गेल्याने भाविकांची चिंता वाढली आहे. नदीचा बदललेला प्रवाह आणि वाढलेली पाणीपातळी यामुळे या पवित्र स्थळाचे दर्शन घेणे कठीण झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 11:03 AM
नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

Follow Us
Follow Us:
  • ३१ टन वजनाचा विशाल शालिग्राम पाण्यात बुडाला
  • सुमारे १७.५ कोटी वर्षे जुना जीवाश्म असल्याचे मानले जाते
  • भाविकांना आता दुरूनच पूजा-अर्चा करून परतावे लागत आहे
नेपाळमधील नद्यांचे प्रवाह बदलणे आणि पाण्याची पातळी वाढल्याचा परिणाम शतकानुशतके पूजल्या जाणाऱ्या विशाल शालिग्रामवर झाला आहे. हिंदू धर्मीय लाखो भाविक ज्या पवित्र शिळेची पूजा करतात, ती पाण्यात बुडाली आहे. नेपाळमधील गुल्मी, स्यांग्जा आणि पर्वत या तीन जिल्ह्यांच्या संगमावर असलेल्या सेतीबेनी येथे ही शालिग्राम शिळा आहे. सेती नदीचा प्रवाह बदलल्याने ही पवित्र शिळा पाण्याखाली गेली आहे.

Nepal Flash flood: नेपाळमधील देविघाटमध्ये महापुराची दुसरी लाट; दूषित पाणी आणि साथीच्या आजारांचा मोठा धोका

पावसाळ्यात कालीगंडकी नदीची पाणीपातळी वाढणे आणि सेती नदीचा प्रवाह बदलल्याने हे पवित्र स्थळ पाण्यात गेले आहे. त्यामुळे भाविकांना येथे पोहोचणे कठीण झाले आहे. नद्यांचे प्रवाह बदलणे आणि नदीपात्राच्या हद्दीत येणाऱ्या भागांमुळे स्थानिक प्रशासनावरही टीका होत आहे. ‘रायझिंग नेपाळ डेली’च्या वृत्तानुसार, आशियातील सर्वांत मोठ्या शालिग्राम शिळेचे संरक्षण करण्यात अपयश आल्याने अधिकाऱ्यांवर टीका होत आहे. भाविकांना आता दूरूनच पूजा-अचर्चा करून परतावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

वजन तब्बल ३१ टन

नेपाळशी संबंधित हा सर्वांत मोठा शालिग्राम प्रत्यक्षात अॅमोनाइटचा एक विशाल नैसर्गिक जीवाश्म आहे. प्राचीन काळात जेव्हा हिमालयाच्या जागी तेथीस महासागर होता तेव्हा भूगर्भीय हालचालींमुळे नंतर तिथे हिमालय पर्वत निर्माण झाला. यामुळे सागरी जीव तिथेच दबले गेल्याचे म्हटले जाते ज्यांचे पुढे दगडात रुपांतर झाले. त्यामुळे शालिग्राम दगडांवर चक्रासारख्या नैसर्गिक आकृत्या दिसल्याचे सांगितले जाते. त्याचे वजन सुमारे ३१ टन असून, तो जगातील सर्वांत मोठा शालिग्राम मानला जातो. मुक्तिनाथ धामाजवळील पवित्र कालीगंडकी नदीच्या परिसरात सापडलेली ही विशाल शिळा सुमारे १७.५ कोटी वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार

धार्मिक महत्त्व

सेतीबेनी येथे नेपाळी नववर्ष, हरिशयनी एकादशी, हरिबोधिनी एकादशी आणि मकरसंक्रांतीच्या काळात मोठ्या धार्मिक यात्रा आणि मेळावे भरतात. या पवित्र स्थळी वर्षभर दररोज पूजा-अर्चा केली जाते. शालिग्रामला केवळ नेपाळमध्येच नव्हे, तर भारतासह दक्षिण आशियातील इतर देशांतील हिंदू धर्मीयांमध्येही विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथे सातत्याने भाविक दर्शन आणि पूजेसाठी येत असतात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Nepal 31 ton shaligram stone submerged in water setibeni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • nepal
  • Nepal Flood
  • World news

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
2

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
3

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव
4

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.