Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Nepal flood news: नेपाळमधील जलप्रलयानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी शिवसेनेकडून बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणल्याची माहिती प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 06:32 PM
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांची सुखरूप सुटका
  • कैलास मानसरोवर यात्रेतील ३७ पर्यटक पुण्यात परतले
  • नाशिकमधील ११ विद्यार्थ्यांनाही सुरक्षित मायदेशी आणले

Nepal Flood News : नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयानंतर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी शिवसेनेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वातील बचाव पथकाने नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरुप मायदेशी परत आणले. यात नाशिकमधील ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नेपाळमध्ये महाप्रलयानंतर तेथे पर्यटनासाठी गेलेले हजारो पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वात एक मदत पथक मागील चार दिवसांपासून नेपाळमध्ये कार्यरत आहे. या पथकाने महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क सुरु केला असून यातील ४८ पर्यटकांना सुखरुप मायदेशी पाठवण्यात आल्याचे निरुपम म्हणाले.

कैलास मानसरोवर यात्रेतील ३७ पर्यटक परतले

कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ३७ पर्यटक २९ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या माध्यमातून पुण्यात परतले. या पर्यटकांना काठमांडू ते गोरखपूरपर्यंत बसमार्गे आणि तेथून विमानाने पुण्यात पाठवण्यात आले. तसेच नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील ११ विद्यार्थी नेपाळला गेले होते. या सर्व विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या पथकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना अन्नपदार्थ, औषधे यांची मदत केली आणि पुन्हा नाशिकला परतण्याची व्यवस्था केल्याचे निरुपम म्हणाले. यात शुभम शिंदे, ओकांर शिंदे, आय़ुष शिंदे, रुपेश बोंगे, विशाल शिंदे, करण शिंदे, आकाश कौतुडकर, रोहीत शिंदे, अभिषेक पवार, अर्जुन शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…

मुंबईतील ६६ पर्यटक बेपत्ता असल्याचा दावा

निरुपम पुढे म्हणाले की, मुंबईतील ६६ पर्यटक अद्याप नेपाळमधील प्रलयात बेपत्ता आहेत. यात डॉ. चितळे यांचाही समावेश आहे. या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या बचाव पथकाकडून केले जात आहेत. दोन देशांमध्ये सीमा असतात पण माणुसकीला सीमा नसते, म्हणूनच शिवसेना सीमा ओलांडून मदतीचे काम करत आहे, असे निरुपम म्हणाले. यापूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ६०० पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात आले होते, असे ते म्हणाले.

बाबरप्रेम आवरा, ओवेसींवर टीका

बाबरच्या नेतृत्वात मुघलांनी भारतात खूप अत्याचार केले हे विसरता येणार नाही. अयोध्येत श्रीरामांच्या जन्मभूमीवर बाबरच्या नावे बाबरी मस्जिद होती, तो एक कलंक होता तो मिटवण्याचे काम आम्ही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान केले म्हणजे बाबरे पाप आम्ही विसरु शकत नाही, असे संजय निरुपम म्हणाले. त्यामुळे ओवेसी यांनी बाबर प्रेम आवरावे, अशी टीका संजय निरुपम यांनी केली. अफगाणिस्तानातून मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण केली, सोमनाथ मंदिर १७ वेळा लुटले. सोमनाथवरील हल्ल्याला एक हजार वर्ष पूर्ण झाली. मात्र आधुनिक अफगाणिस्तानच्या पुनर्निमाणात भारताचे मोठे योगदान आहे, असे निरुपम म्हणाले.

Nepal Flood : नेपाळमध्ये बचाव पथकाला सापडला खजिना; 50 कोटी रुपयांचे सोने दीड कोटी रुपयांची रोकड, VIDEO VIRAL

Web Title: Nepal flood news maharashtra tourists rescued shiv sena sanjay nirupam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kailas mansarovar yatra
  • Nepal Flood
  • Sanjay Nirupam
  • shivsena

संबंधित बातम्या

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
1

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Flood : नेपाळमध्ये बचाव पथकाला सापडला खजिना; 50 कोटी रुपयांचे सोने दीड कोटी रुपयांची रोकड, VIDEO VIRAL
2

Nepal Flood : नेपाळमध्ये बचाव पथकाला सापडला खजिना; 50 कोटी रुपयांचे सोने दीड कोटी रुपयांची रोकड, VIDEO VIRAL

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
3

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Nepal Floods: नेपाळमधील त्रिभुवन त्रिशुली शाळेची थरारक कथा; बोधी वृक्षाखाली एकत्र आली मुले अन् डोळ्यांदेखत वाहून गेली शाळा
4

Nepal Floods: नेपाळमधील त्रिभुवन त्रिशुली शाळेची थरारक कथा; बोधी वृक्षाखाली एकत्र आली मुले अन् डोळ्यांदेखत वाहून गेली शाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.