Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Economy : चीनच्या मैत्रीचा नेपाळला बसला 50 अब्ज रुपयांचा फटका! वाचा 5 वर्षांपासून धूळ खाणाऱ्या विमानांचे ‘शॉकिंग’ सत्य

Nepal Airlines Crisis: नेपाळ एअरलाइन्ससाठी चिनी विमाने 'पांढरा हत्ती' ठरत आहेत. ५० अब्ज रुपयांचे कर्ज आणि देखभालीचा प्रचंड खर्च यामुळे ही विमाने काठमांडू विमानतळावर धूळ खात पडली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 01:11 PM
nepal airlines financial crisis chinese planes grounded debt trap 2026

nepal airlines financial crisis chinese planes grounded debt trap 2026

Follow Us
Follow Us:
  • चीनचा ‘कर्जसापळा’
  • विमानांची दुरवस्था
  • फसवे अनुदान

MA-60 and Y-12E planes Nepal status : निसर्गरम्य नेपाळ सध्या एका अशा संकटात सापडला आहे, ज्याचे मूळ शेजारील देश चीनच्या ‘कर्जसापळ्यात’ (Debt Trap) दडलेले आहे. नेपाळची सरकारी विमान कंपनी ‘नेपाळ एअरलाईन्स’ (Nepal Airlines) आज अस्तित्वाच्या लढाईला सामोरी जात आहे. चीनकडून घेतलेली विमाने नेपाळसाठी मदतीचा हात ठरण्याऐवजी गळ्याचा फास बनली आहेत. तब्बल ५० अब्ज रुपयांचे कर्ज आणि विमानांची दुरवस्था यामुळे काठमांडू विमानतळावर चिनी बनावटीची ही विमाने आज केवळ ‘पांढरा हत्ती’ म्हणून उभी आहेत.

मैत्रीचे गाजर आणि कर्जाचा डोंगर

या वादाची सुरुवात सुमारे एका दशकापूर्वी झाली. २०१४ मध्ये चीनने नेपाळला आपले MA-60 आणि Y-12E ही विमाने देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही विमाने अनुदान म्हणून दिली गेली, परंतु उर्वरित विमानांसाठी नेपाळला कोट्यवधी युआनचे कर्ज घेण्यास भाग पाडले गेले. नेपाळने आपल्या देशांतर्गत विमानसेवेला बळकटी मिळेल या आशेने हे कर्ज स्वीकारले, पण लवकरच ड्रॅगनचा खरा चेहरा समोर आला. आज हे कर्ज व्याजासह इतके वाढले आहे की केवळ एका वर्षात व्याजाचा बोजा ६८० दशलक्ष रुपयांनी वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peace Talks Fail : शांतता चर्चेमागे मोठा कट! JD Vance ना नेतान्याहूंचा फोन अन् चर्चा फिसकटली; इस्लामाबादमध्ये नक्की काय घडले?

‘न उडणारी’ विमाने आणि कोट्यवधींचा खर्च

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही विमाने गेल्या पाच वर्षांपासून जमिनीवरच आहेत. तांत्रिक बिघाड, सुट्या भागांची कमतरता आणि नेपाळच्या भौगोलिक रचनेनुसार ही विमाने सक्षम नसल्याने नेपाळ एअरलाईन्सने २०२० मध्येच ती सेवेतून काढून टाकली. मात्र, ही विमाने उडत नसली तरी त्यांचा खर्च थांबलेला नाही. विमा, पार्किंग आणि इंजिनची जुजबी देखभाल यासाठी नेपाळला दरवर्षी २०० दशलक्ष रुपये खर्च करावे लागत आहेत. नेपाळने ही विमाने भाड्याने देण्याचा प्रयत्न केला, परंतु जगातील एकाही कंपनीने ही ‘चिनी खेळणी’ घेण्यास रस दाखवला नाही.

Chinese planes continue to be a costly burden for Nepal Airlines Grounded for years, the aircraft continue to drain millions as efforts to sell, lease, or return them fail amid financial and diplomatic constraints.https://t.co/pkID6SDDpi —by @sangamprasai — The Kathmandu Post (@kathmandupost) April 13, 2026

credit – social media and Twitter

वैमानिकांची कमतरता आणि तांत्रिक फसवणूक

चीनने विमाने तर दिली, पण ती चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण नेपाळच्या वैमानिकांना दिले नाही. या विमानांचे सुटे भाग केवळ चीनमध्येच मिळतात आणि त्यांची किंमतही गगनाला भिडलेली आहे. जेव्हा कधी बिघाड होतो, तेव्हा चीनकडून मदत मिळण्यास महिनोन्महिने लागतात. यामुळे नेपाळ एअरलाईन्सचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. ५० अब्जांच्या कर्जाखाली दबलेली ही कंपनी आता ही विमाने ना विकू शकते, ना परत करू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Atomic Threat : ‘अमेरिकाच जिंकेल!’ वाटाघाटी निष्फळ होताच ट्रम्पना राग अनावर; अणुबॉम्बवरून जगाला दिला युद्धाचा इशारा

चीनच्या विस्तारावादी धोरणाचा बळी?

तज्ज्ञांच्या मते, नेपाळला आपल्या पंखाखाली घेण्यासाठी चीनने रचलेला हा एक सुनियोजित कट होता. श्रीलंकेप्रमाणेच नेपाळलाही पायाभूत सुविधांच्या नावाखाली कर्ज देऊन आपले गुलाम बनवण्याचे धोरण चीन राबवत असल्याचे दिसून येते. आज नेपाळची जनता आणि सरकार या चिनी विमानांमुळे हतबल झाले आहेत. हे विमान संकट केवळ एका एअरलाईनचे नसून, ते एका राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आलेल्या आर्थिक संकटाचे प्रतीक बनले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळ एअरलाईन्सवर सध्या किती कर्ज आहे?

    Ans: नेपाळ एअरलाईन्सवर चिनी विमाने आणि इतर कारणांमुळे ५० अब्ज नेपाळी रुपयांहून अधिक कर्जाचा बोजा आहे.

  • Que: चिनी विमाने नेपाळमध्ये का उडू शकत नाहीत?

    Ans: तांत्रिक दोष, सुट्या भागांची टंचाई, प्रशिक्षित वैमानिकांची कमतरता आणि नेपाळच्या डोंगराळ भागासाठी ही विमाने अयोग्य असल्याने ती जमिनीवर आहेत.

  • Que: विमानांच्या देखभालीसाठी दरवर्षी किती खर्च येतो?

    Ans: विमाने उडत नसली तरी विमा आणि पार्किंगसाठी नेपाळला दरवर्षी अंदाजे २०० दशलक्ष रुपये खर्च करावे लागतात.

Web Title: Nepal airlines financial crisis chinese planes grounded debt trap 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • China
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
1

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
2

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
3

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
4

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.