Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे! आता तुम्ही २०० आणि ५०० रुपयांच्या नवीन भारतीय नोटा खिशात बाळगू शकता. कमाल २५,००० रुपये बाळगण्याची परवानगी आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 26, 2026 | 04:04 PM
nepal allows indian currency 200 500 rupee notes 25000 limit

nepal allows indian currency 200 500 rupee notes 25000 limit

Follow Us
Follow Us:
  • ₹२०० आणि ₹५०० च्या नोटांना मंजुरी
  • ₹२५,००० ची कमाल मर्यादा
  • जुन्या आणि ₹२००० च्या नोटांवर बंदी कायम

जर तुम्ही आगामी दिवसांत नेपाळची सफर करण्याचे नियोजन करत असाल किंवा दोन्ही देशांमधील सीमापार व्यापाराशी जोडलेले असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे. नेपाळ (Nepal) सरकारने भारतीय चलनाच्या वापराबाबत एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ लागू असलेल्या निर्बंधांनंतर आता नेपाळमध्ये ₹२०० आणि ₹५०० च्या नवीन भारतीय चलनी नोटा अधिकृतपणे वापरता येणार आहेत. यामुळे पर्यटकांना आता फक्त १०० रुपयांच्या लहान नोटांचे मोठे गठ्ठे सोबत घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही.

नेपाळची मध्यवर्ती बँक ‘नेपाळ राष्ट्र बँक’ (NRB) कडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, भारतीय तसेच नेपाळी नागरिक आता ₹२०० आणि ₹५०० च्या भारतीय नोटा नेपाळमध्ये आणू शकतात अथवा नेपाळमधून बाहेर नेऊ शकतात. मात्र, वित्तीय शिस्त आणि सुरक्षा लक्षात घेता यासाठी प्रतिव्यक्ती ₹२५,००० ची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीनंतर जारी केलेल्या नव्या नोटांनाच ही परवानगी लागू असेल. या निर्णयामुळे नेपाळमधील हॉटेल्स, पर्यटन आणि स्थानिक बाजारपेठेतील उलाढालीला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात

कोणत्या नोटांवर बंदी कायम राहणार?

नेपाळ राष्ट्र बँकेने आपल्या आदेशात हे स्पष्ट केले आहे की, ९ नोव्हेंबर २०१६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या जुन्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये पूर्ण बंदी कायम राहील. याशिवाय, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनातून मागे घेतलेल्या २,००० रुपयांच्या नोटांनाही नेपाळमध्ये स्थान नसेल. म्हणजेच, केवळ सध्या भारतात वैध असलेल्या ₹२०० आणि ₹५०० च्या नवीन नोटाच नेपाळमध्ये स्वीकारल्या जातील.

नेपाल ने भारतीय करेंसी पर लगाई पाबंदी हटाई, 200 और 500 रुपये के नोट लाने-ले जाने की दी अनुमतिhttps://t.co/yzRmFDrgkx — India TV (@indiatvnews) July 26, 2026

credit – social media and Twitter

परकीय चलन आणि तिसऱ्या देशांविषयीचे कडक नियम

एनआरबीचे (NRB) प्रवक्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चलनाचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. नेपाळी नागरिकांना भारत सोडून इतर कोणत्याही तिसऱ्या देशातून भारतीय चलन नेपाळमध्ये आणता येणार नाही. तसेच नेपाळमधून भारताव्यतिरिक्त अन्य देशात प्रवास करताना भारतीय रुपया सोबत नेता येणार नाही.

परदेशी पर्यटकांसाठी असलेल्या डॉलर नियमांनुसार, कोणताही पर्यटक ५,००० अमेरिकन डॉलर किंवा त्यासममूल्य परकीय चलन न सांगता (विना कस्टम डिक्लेरेशन) नेपाळमध्ये आणू शकतो. मात्र, जर रक्कम ५,००० डॉलरपेक्षा जास्त असेल, तर सीमेवर कस्टम अधिकाऱ्यांकडे त्याची रीतसर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट

भारत-नेपाळ संबंध आणि आर्थिक उलाढालीला गती

भारत आणि नेपाळ दरम्यान खुली सीमा असून दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध आहेत. नेपाळचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार भारतच आहे. हजारो नेपाळी नागरिक भारतात रोजगार करतात आणि कोट्यवधी भारतीय पर्यटक दरवर्षी पशुपतीनाथ दर्शन आणि पर्यटन सफरीसाठी नेपाळला भेट देतात.

२०१६ मधील नोटाबंदीनंतर मोठ्या नोटांवर बंदी आल्यामुळे भारतीय पर्यटकांना नेपाळमध्ये वस्तू खरेदी करताना किंवा हॉटेल्सचे बिल भरताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता ₹२०० आणि ₹५०० च्या नोटांना २५ हजारांच्या मर्यादेत मान्यता मिळाल्यामुळे पर्यटन क्षेत्रातील अडथळे दूर होऊन सीमेवरील लहान-मोठ्या व्यापाराला नवी उर्जा मिळणार आहे.

Web Title: Nepal allows indian currency 200 500 rupee notes 25000 limit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • currency
  • India-Nepal Relation
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध
1

BRICS Summit 2026: तथाकथित G7 ची पिछेहाट! दिल्लीत पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना दाखवला आरसा; जागतिक GDPत ब्रिक्सचे वर्चस्व सिद्ध

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
2

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
3

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
4

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.