Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! ३ आठवड्यांतच कोसळणार बालेन सरकार? गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

Nepal Political News : नेपाळच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पद सोडले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या बालेन शाह सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 05:04 PM
Nepal home minister Sudan Gurung Resignation

Nepal home minister Sudan Gurung Resignation

Follow Us
Follow Us:
  • बालेन शाह यांना मोठा धक्का
  • भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गृहमंत्री सुदान यांचा राजीनामा
  • तीन आठवड्यातच कोसळणार नवे सरकार?
Nepal Political Crisis : काठमांडू : नेपाळ (Nepal) च्या नव्या राजकारणा मोठी उलथापालथ सरु आहे. अवघ्या तीन आठवड्यातच सत्तेवर आलेल्या बालेन शाह सरकारला मोठा धक्का बसला आहे. नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बालेन शाह सरकारची स्थिरता धोक्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nepal News : नेपाळमध्ये नव्या पंतप्रधानांविरोधात संतापाची लाट; बालेन शाह यांना ‘तो’ निर्णय पडणार महागात

नेमकं प्रकरणा काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांच्या भ्रष्टाचाराचा आणि उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आले आहे. काही वादग्रस्त व्यावसायिकांच्या कंपन्यांकडून स्वीट शेअर्स खरेदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुदन यांनी अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. मात्र आता ते स्वत:च चौकशीच्या घेरात अडकले आहेत.

काय आहे राजीनामा देण्याचे कारण?

सुदन यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देताना त्यांनी स्पष्ट केले आहे की, माझ्यासाठी पदापेक्षा नैतिकता आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. सध्या नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या तरुणांकडून सुशासन आणि पारदर्शकतेसाठी आंदोलने सुरु आहे. याचा आदर राखण्यासाठी आणि तपासात कोणताही अडथला येऊ नये यासाठी आपण रानीमा देत असल्याचे सुदन यांनी म्हटले आहे.

सरकारसमोरील आव्हाने

बालेन शाह सरकार सत्ते येऊन महिनाही पूर्ण झालेला नाही. मात्र नव्या सरकारच्या निर्णयामुळे जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. गृहमंत्री सुदन गुरंग यांचा राजीनामा, भारत-नेपाळ सीमेवरील व्यापारी धोरणे यांमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.

भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर सीमा शुल्क लावल्याने नेपाळमध्ये महागाई वाढली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच यामुळे भारत-नेपाळ संबंध (India Nepal Relations) ही ताणले जाण्याची शक्यता आहे.

सध्या सुदन गुरुंग यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावरील आरोपांची तपासणी केली जाणार आहे. यावर पंतप्रधान बालेन शाह काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे. एका बाजूला राजकीय अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा असंतोषामुळे मोठा पेच निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा : Salary Policy : सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोनदा पगार मिळणार; नव्या सरकारचा मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळच्या गृहमंत्री सुदन गुरुंग यांना पदाचा राजीनामा का दिला?

    Ans: गृहमंत्री सुदन गुरुंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा, व्यावसायिकांच्या कंपन्यांकडून स्वीट शेअर्स खरेदी केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान पदावर राहणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी आपले पद सोडले आहे.

  • Que: बालेन शाह सरकारसमोर सध्या कोणत्या अडचणी आहेत?

    Ans: सध्या नव्या सरकारसमोर दुहेरी संकट आहे. सत्तेत येऊन ३ आठवडे झाले असतानाच गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोपांमुळे सरकारची प्रतिमा खराब झाली आहे. तसेच भारताकडून येणाऱ्या वस्तूंवर शुल्क लादल्याने जनतेत संतापाचे वातावरण आहे.

Web Title: Nepal news home minister sudan gurung resignation balen shah government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Balen Shah
  • India Nepal Border
  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

India Nepal Realtions : सीमा वादाच्या PM बालेन वक्तव्यावर नेपाळचा यु-टर्न? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
1

India Nepal Realtions : सीमा वादाच्या PM बालेन वक्तव्यावर नेपाळचा यु-टर्न? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Myanmar Civil War : भारताच्या शेजारील देशात संघर्ष भडकला; राजधानीवर बंडखोरांचा दबाव
2

Myanmar Civil War : भारताच्या शेजारील देशात संघर्ष भडकला; राजधानीवर बंडखोरांचा दबाव

South Korea Election : स्थानिक निवडणूकांवरुन गोंधळ ; मतदानात गैरप्रकाराच्या आरोपावरुन हजारो नागरिक रस्त्यावर
3

South Korea Election : स्थानिक निवडणूकांवरुन गोंधळ ; मतदानात गैरप्रकाराच्या आरोपावरुन हजारो नागरिक रस्त्यावर

Israel Lebanon War : इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, हिजबुल्लाहची 150 ठिकाणे उद्ध्वस्त; एका ब्रिगेडियर जनरलसह 12 जण ठार
4

Israel Lebanon War : इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, हिजबुल्लाहची 150 ठिकाणे उद्ध्वस्त; एका ब्रिगेडियर जनरलसह 12 जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.