
nepal balen shah
नेपाळमध्ये सत्ता हालवण्यासाठी शिजतोय कट? चार राजकीय पक्षांच्या कुटनीतीची जगभरात चर्चा
बालेन शाह यांच्या राजीनामा देण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नेपाळच्या निवडणूक कायद्यांचे पालन होणे आवश्यक आहे. नेपाळच्या निवडणूकीच्या कायद्यानुसार, कोणत्याही निवडून आलेल्या प्रतिनिधीला संसदीय निवडणूक लढवायची असेल तर त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. परंतु बालेन शाह यांनी हा निर्णय त्यांच्या पदाच्या कार्यासाठी दीड वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने घेतला आहे.
2022 च्या निवडणुकीत बालेन शाह यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला होता. त्यांनी अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या पराभव करत महापौर पद मिळवले होते. नेपाळमध्ये बालेन शाह यांनी तरुणांचा नेता म्हणून ओळखले जाते. 2022 पासून त्यांच्या लोपक्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष करुन जनरेशन झेडच्या तरुणांमध्ये बालेन शाह प्रचंड लोकप्रिय आहेत.
त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच भ्रष्ट्राचाराविरोधात थेट भूमिका घेतली आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यांमध्ये देखील थेट आणि स्पष्टपमे दिसून येतो. शिवाय ते सोशल मीडियावरुन सतत जनतेच्या मुख्यता तरुणांच्या संपर्कात असतात. गेल्या वर्षी नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांच्या काळात त्यांना कार्यवाहक पंतप्रधान करण्याची मागणीही केली जात होती. पण त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
सध्या बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) एकत्र लढवण्याचा करार केला आहे. यानुसार बालेन शाह यांचा गट निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या RSP च्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. यानंतर बालेन शाहच्या संघाचे RSP मध्ये विलीनीकरण होणार आहे. केवळ पक्षाचे नाव, ध्वज आणि चिन्ह अपरिवर्तित राहील असे त्यांनी म्हटले आहे.
Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार
Ans: नेपाळच्या निवडणूकीच्या कायद्यानुसार, कोणत्याही निवडून आलेल्या प्रतिनिधीला संसदीय निवडणूक लढवायची असेल तर त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. यामुळेच बालेन शाह यांनी संसदीय निवडणुका लढवण्यासाठी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे.
Ans: बालेन शाह राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) तून आणि झापा -5 मतदारसंघातून निवडणुका लढवणार आहेत.
Ans: बालेन शाह यांना युवांचा मजबूत पाठिंबा आहे, तसेच त्यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी भूमिकेमुळे मोठ्या राजकीय पक्षांसाठी मोठे आव्हानं ठरणार आहे. निवडणूक अधिक चूरशीची होण्याची शक्यता आहे.