Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL

Nepal Flood : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे तिमुरे बाजार, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. सुमारे १,००० लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 26, 2026 | 02:31 PM
Nepal Rasuwagadhi flood news Bhotekoshi river flash flood

Nepal Rasuwagadhi flood news Bhotekoshi river flash flood

Follow Us
Follow Us:
  • अचानक आलेला महापूर
  • मोठ्या प्रमाणावर लोक प्रभावित
  • भारत-नेपाळ अलर्ट

नेपाळमधील (Nepal Flood) रसुवा (Rasuwa) जिल्ह्यात एका भीषण नैसर्गिक आपत्तीने थरकाप उडवला आहे. तिबेटच्या (चीन) दिशेने अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे सीमेवरील तिमुरे बाजार, अनेक रस्ते, महत्त्वाचे पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या महापुरात सुमारे १,००० नागरिक प्रभावित झाले असून अनेक जण पुराच्या पाण्यात अडकल्याची किंवा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुराचे पाणी इतक्या वेगाने आले की लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळच मिळाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९ च्या सुमारास भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली. तिमुरे आणि स्याफ्रुबेसी भागात नदीकाठच्या सखल भागांत पाणी वेगाने शिरले. या पुराच्या तडाख्यात सीमावर्ती कस्टम्स ऑफिसच्या आवारात उभी असलेली वाहने, मालवाहू कंटेनर्स आणि व्यापारी दुकाने वाहून गेली आहेत. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने गेल्या वर्षीच्या पुरानंतर नुकताच नव्याने उभारलेला रसुवा गढीचा मुख्य पूल देखील पाण्याच्या तुफानी प्रवाहामुळे पुन्हा एकदा वाहून गेला आहे. यामुळे चीनसोबतचा सीमावर्ती संपर्क आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Today, a devastating sudden surge in the Bhotekoshi River has caused widespread destruction, with fears that several people may have been killed or swept away. 📍Rasuwa District, Nepal, along the China border. pic.twitter.com/52if8LGlO9 — Weather Monitor (@WeatherMonitors) August 26, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी

३० पोलिसांशी संपर्क तुटला; बचावकार्य युद्धपातळीवर चालू

या घटनेत सर्वात चिंतेची बाब म्हणजे तिमुरे परिसरात तैनात असलेल्या सशस्त्र पोलीस दलाच्या (APF) तुकडीशी संपर्क तुटला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, सुमारे ३० पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षक बेपत्ता किंवा संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीला वाचवण्यात यश आले असले तरी प्रत्यक्ष घटनास्थळी तैनात असलेल्या पथकाशी संपर्क होऊ शकलेला नाही. नेपाळ प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव पथके (Armed Police Force & Nepal Army) बाधित भागांमध्ये रवाना केली असून वैद्यकीय मदतीसाठी हेलिकॉप्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

Today, a flash flood has swept through markets, settlements, and hydropower projects along the Bhotekoshi River in Timure and Syabrubesi, Gosainkunda Rural Municipality, Rasuwa District, Bagmati Province, Nepal. pic.twitter.com/DWVsGQpRzV — Weather Monitor (@WeatherMonitors) August 26, 2026

credit – social media and Twitter

हवामान तज्ज्ञांच्या मते, रसुवा जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कोणताही मोठा मुसळधार पाऊस झालेला नव्हता. तरीही आलेला हा अचानक पूर तिबेटमधील हिमनदी तलावाच्या फुटीमुळे (Glacial Lake Outburst Flood – GLOF) किंवा पर्वतीय भागात अचानक साचलेले पाणी फुटल्यामुळे आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य ओळखून नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण प्राधिकरणाची तातडीची बैठक बोलावली असून ते स्वतः परिस्थितीवर क्षणोक्षणी बारीक लक्ष ठेवून आहेत.

These visuals from the floods in Rasuwa, Nepal are absolutely horrific. The scale of the destruction looks unreal, almost like a scene from a disaster movie.The entire Himalayan belt needs to seriously work on better early warning systems for such flash floods. Prayers for… pic.twitter.com/7iiupXXIzT — Nikhil saini (@iNikhilsaini) August 26, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध

नेपाळसह बिहारच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी

नदीच्या प्रवाहाचा वाढता वेग पाहता नेपाळ प्रशासनाने रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन या जिल्ह्यांतील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

This video from the @NepalRedCross Rasuwa District Branch illustrates the enormous force of this morning’s flash flood. @NepalRedCross is mobilizing immediate relief efforts. pic.twitter.com/4LLSY00pep — David Fisher (@David_A_Fisher) August 26, 2026

credit – social media and Twitter

दरम्यान, नेपाळमधील या पुराचा प्रभाव भारतातही दिसून येण्याची शक्यता आहे. नेपाळमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी थेट बिहारच्या सीमेत प्रवेश करत असल्याने बिहार प्रशासनाने तातडीने हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषतः पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण आणि बागाहा या सीमावर्ती भागातील नदीकाठच्या गावांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. जलसंपादक आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Nepal rasuwagadhi bhotekoshi flash flood disaster marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • flood
  • nepal
  • Video Viral
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: अरुणाचल प्रदेशचा वाद अन् चीनचे मौन; शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यावरून सस्पेन्स; काय आहे चीनचा खरा हेतू?
1

BRICS Summit 2026: अरुणाचल प्रदेशचा वाद अन् चीनचे मौन; शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यावरून सस्पेन्स; काय आहे चीनचा खरा हेतू?

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी
2

रील्सच्या नादात क्रूरतेची हद्द ओलांडली! डॉल्फिनला सायकलला बांधून बनवला VIDEO; नेटकरी भडकले, कारवाईची मागणी

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध
3

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने
4

मदर्स डेच्या कार्यक्रमासाठी बाबा बनले आई! लेकीसाठी सिंगल डॅडने घातला ड्रेस, व्हिडिओने जिंकली यूजर्सची मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.