New political era beginning in Bangladesh Student protesters set to launch new party in Bangladesh
ढाका: सध्या बांगलेशमध्ये मोठ्या राजकीय परिवर्तनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर आणि त्यानंतर घडलेल्या अस्थिरतेमुळे सध्या देशातील काही विद्यार्थी गट नव्या पक्ष स्थापनेसाठी तयारी करत आहेत. गेल्या काही काळात बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. तसेच अनेक अल्पसंख्यांकीय धार्मिक लोकांवर, बौद्ध लोकांवर हिंदूं आणि ख्रिश्चनांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात होती.
नवीन पक्षाची स्थापना आणि नवी रणनिती
मिळालेल्या माहितीनुसार, हसीना यांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या आणि त्यांच्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या तीन आठवड्यामध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या हालचालींमध्ये बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांची भूमिका असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण युनूस यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांना थेट राजकारणात प्रवेश करायचा नाही.
विद्यार्थी आंदोलन आणि हिंसाचार
विद्यार्थी आंदोलन सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये असलेल्या कोट्याविरोधात ऑगस्ट 2024 मध्ये स्टुडंट्स अगेंस्ट डिस्क्रिमिनेशन या गटाने आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक रुप धारण केले होते. यामुळे संपूर्ण देशात असंतोष पसरला होता. या परिस्थितीत शेख हसीना यांच्यांवर देश सोडण्याची वेळ आली होती. हिंसाचाराच्या या घटनांमध्ये हजारहून अधिक नारगिकांचा मृत्यू झाला आहे.
अंतरिम सरकार आणि युनूस यांची भूमिका
शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अंतिरम सरकारची स्थापना करण्यात आली. तसेच सरकारमध्ये नाहिद इस्लाम यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता नव्या इस्लाम पक्षाचे नेतृत्त्व देखील त्यांना देण्यात येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.
नवा पक्ष आणि आगामी निवडणुका
येत्या दोन दिवसांत नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलादेशच्या राजकीय वातावरणात मोठे बदल होऊ शकतात. मात्र, निवडणुका कधी होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. युनूस यांनी 2025 च्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात, असे सांगितेल आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या युवक नेतृत्वाच्या पक्षामुळे बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होतील.
देशात अस्थिरता कायम
बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांदरम्यान अनेक गंभीर मानवाधिकार घटनांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय अमेरिकेने देखील बांगलादेशविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. संयुक्ता राष्ट्र मानवाधिकार संघटनने म्हटले आहे की, हसीना यांच्या सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी सुरक्षा यंत्रणां गैरवापर केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच मोहम्महद युनूस आणि अंतरिम सरकारवरही हिंसाचाराच्या घटनामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे पुढे काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.