भारताआधी बांगलादेशात सुरु होणार स्टारलिंक? मोहम्मद युनूसचे एलॉन मस्कला आमंत्रण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशमध्ये लवकरच स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेच सेवा सुरु होण्याची शक्यता वाढली आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी स्पेसएक्सचे प्रमुख आण प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांना देशात येण्याचे आणि पुढील 90 दिवसांत स्टारलिंक सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे भारताआधी बांगलादेशात स्टारलिंक सुरु होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
स्टारलिंक बांगलादेशसाठी का महत्त्वाचे?
युनूस यांनी एलॉन मस्क यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केल आहे की, स्टारलिंकच्या माध्यमातून बांगलादेशच्या ग्रामीण आणि गुर्गम भागांत लोकांना उत्तम इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. यामुळे देशातील तरुण उद्योजक, महिला आणि इचर वंचित समुदायांना मोठा फायदा होईल. सध्याची परिस्थिती पाहता बांगलादेशात इंटरनेट सेवा भारताच्या तुलनेत कमी आहे. यामुळे स्टारलिंकद्वारे ही समस्या दूर होऊ शकते.
Chief Adviser Professor Muhammad Yunus has invited top US businessman and Chief Executive Officer of SpaceX @elonmusk to visit Bangladesh and launch Starlink satellite service in the country.#Bangladesh #ChiefAdviser #Starlink pic.twitter.com/6MQeYcUfjD
— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) February 23, 2025
मोहम्मद युनूस आणि एलॉन मस्क यांच्यात चर्चा
मोहम्मद युनूस आणि एलॉन मस्क यांच्यात 13 फेब्रुवारीलाही फोनवर चर्चा झाली होती. यादरम्यान दोघांनी बांगलादेशमध्ये स्टारलिंक सेवा सुरु करण्याच्या संधींबाबत चर्चा केली. नंतर युनूस यांनी अधिकृत निमंत्रण पाठवले स्टारलिंकचे बांगलादेशमध्ये जलद प्रक्षेपण करण्यासाठी डॉ. खलीलुर रहमान यांची उच्च प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. स्टारलिंकची सेवा बांगलादेशमध्ये लवकर सुरू झाली, तर ते आर्थिक संकटात सापडलेल्या या देशासाठी मोठे यश असेल. कारण, दर्जेदार इंटरनेट सुविधा हे कोणत्याही देशाच्या डिजिटल आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे असते.
भारतातही लवकरच सुरु होणार स्टारलिंक
भारतातही स्टारलिंक सेवा सुरु करण्याच्या हालचालींनी वेग धरला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीने भारतीय सरकारकडे आवश्यक परवाने मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
पहिल्यांदा कुठे सुरु होणार स्टारलिंक ?
सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, स्टारलिंक सेवा भारतात आधी सुरु होणार की बांगलादेशात ? भारतात आधीपासूनच अनेक मोठे टेलिकॉम प्रदाते आहेत, यामुळे स्पर्धा अधिक तीव्र आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशमध्ये इंटरनेट सुविधांची कमतरता असल्यामुळे तेथे स्टारलिंकसाठी मोठी संधी उपलब्ध आहे.