New trio in international politics! Will these three leaders become special friends, leaving Narendra Modi behind
बिजिंग : चीनमध्ये एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाला ३ सप्टेंबर रोजी ८० वर्षे पूर्ण होत आहे. यासाठी चीनची राजधानी बिजिंगमध्ये भव्य समारंभाचे आयोजन करण्यात येणारआहे. या समारंभासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच रशियाचे राष्ट्राअध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे जागतिक राजकारणात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या समारंभासाठी उपस्थित राहणार असल्याचे संकेत क्रेमलिनने दिले आहे. असे झाल्यास पुतिन आणि ट्रम्प यांच्या बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी, राष्ट्राअध्यक्ष व्लादिमिर पुतिन दुसऱ्या महायुद्धाच्या वर्धापन दिनानिमित्त चीनमध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठीच्या उपस्थितीवर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
याच वेळी पेस्कोव्ह यांना पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, दोन्ही जागतिक नेते एकाच वेळी उपस्थित राहिल्यास चीन, अमेरिका आणि रशियामध्ये त्रिपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातही द्विपक्षीय बैठकीची शक्यता नाकारता येत नाही, असे पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनशी सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी रशियाला ‘अल्टीमेटम डेलाईन’ दिली आहे. रशियाला ५० दिवसांत म्हणजेच १ सप्टेंबर पर्यंत संपवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बिजिंगमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संधीचा फायदा चीन जागतिक स्तरावर आपली स्वत:ची राजकीय प्रतिमा बनवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. चीन या समारंभाद्वारे राजनैतिक चाल खेळत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पुतिन आणि ट्रम्प यांचे एकत्र येणे ही चीनसाठी प्रतिष्ठेची आणि जागतिक नेतृत्वासाठी महत्त्वाची बाब आहे.
परंतु अद्याप डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या महायुद्धाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्ती उपस्थित राहणार की नाही याबाबत पुष्टी झालेली नाही. सध्या याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागेल आहे. हा क्षण जागतिक शांततेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे.