उत्तर कोरियाने केले मिसाईलचे परीक्षण (फोटो- istockphoto)
उत्तर कोरियाने केले मिसाईलचे परिक्षण
जपान अमेरिका, दक्षिण कोरिया हाय अलर्टवर
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली चिंता
World News: जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. उत्तर कोरिया देशाने नुकतेच एका मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. यामुळे जगभरातील सुरक्षा व्यवस्था चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर कोरिया देशाने नुकतीच एक शॉर्ट रेंज बॅलेस्टीक मिसाईलचे परीक्षण केले आहे. त्यामुळे जपान , दक्षिण कोरिया आणि अमेरिका हाय अलर्ट मोडवर आले आहेत.
उत्तर कोरियाने परीक्षण केलेले मिसाईल हे शॉर्ट रेंज असल्याचे जपान सरकारने सांगितल आहे. हे मिसाईल समुद्रात डागण्यात आले असून, कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जपान सरकारने सांगितले आहे. जपान सरकार या परिस्थिततीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाच्या पश्चिम किनाऱ्यावरून हे मिसाईल डागण्यात आल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
हे मिसाईल लॉंच होताच ट्रॅक करण्यात आल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले आहे. या मिसाईलने ७०० किमीचा प्रवास केल्याचे समजते आहे. याची माहिती मिळताच अमेरिका आणि जपान हाय अलर्ट मोडवर आले आहेत. काही दिवस आधीच उत्तर कोरियाने अण्वस्त्र क्रुज मिसाईलचे परीक्षण केले होते.
चिनी युद्धनौका भारतीय नौदलाच्या रडारवर
भारत पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. “चिनी युद्धनौका सतत भारतीय नौदलाच्या रडारवर असतात. भारतीय नौदल चिनी युद्धनौकांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.” अस संजय वात्सायन यांनी म्हटलं आहे
भारत पाकिस्तान आणि भारत-चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. “चिनी युद्धनौका सतत भारतीय नौदलाच्या रडारवर असतात. भारतीय नौदल चिनी युद्धनौकांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.” अस संजय वात्सायन यांनी म्हटलं आहे.
हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींमुळे भारतीय नौदल सतर्क आहे. चिनी युद्धनौका नेहमीच भारतीय नौदलाच्या रडारवर असतात. भारतीय सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही अनपेक्षित हालचालींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हे सतत देखरेख आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. शिवाय, इतर देशांशी आमचे संवाद, आमचे सराव आणि आमच्या योजना सुरू आहेत. यावर पूर्णविराम नाही. असही वात्सायन यांनी म्हटलं आहे.
Aadhaar Card Rules: मोफत सेवेपासून ते ऑनलाइन अपडेट्सपर्यंत…, आजपासून आधार कार्डच्या नियमात बदल
अलिकडच्या वर्षांत, चीनने हिंद महासागरात आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्याच्या नौदल क्षमता आणि विस्तारवादी धोरणांमुळे, भारताने चिनी युद्धनौकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. भारताच्या सागरी सुरक्षा धोरणात चीनवर लक्ष ठेवणे हे प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी तयार आहोत आणि तैनात आहोत. आम्ही आमच्या इतर योजना देखील सुरू ठेवू. हा एक अतिशय साधा संदेश आहे.






