फोटो सौजन्य सोशल मीडिया
दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पहिलं क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरील वॉनसान परिसरातून दुपारी सुमारे ३ वाजता डागण्यात आलं. या मिसाईलने जवळपास ४५० किलोमीटरचा पल्ला गाठला. त्यानंतर सुमारे तीन तासांनी त्याच भागातून दुसरं क्षेपणास्त्र डागण्यात आलं.
दुसऱ्या मिसाईलने ६०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केल्याची माहिती देण्यात आली आहे.
Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!
या दोन्ही क्षेपणास्त्रांनी उत्तर कोरियाच्या पूर्वेकडील समुद्राच्या दिशेने प्रवास केला आणि अखेर समुद्रात पडली. जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही पहिल्या प्रक्षेपणाची माहिती दिली. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर पडल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर दक्षिण कोरिया आणि जपानने आपल्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले असून, उत्तर कोरियाच्या पुढील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
उत्तर कोरियाकडून ही क्षेपणास्त्र चाचणी अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा अमेरिका, दक्षिण कोरिया आणि त्यांच्या भागीदार देशांच्या लष्करी सरावावर प्योंगयांगकडून सातत्याने टीका केली जात आहे. उत्तर कोरियाने याआधीही अशा लष्करी हालचालींना आपल्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांवर आक्षेप घेतला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या नव्या प्रक्षेपणानंतर कोरियन द्वीपकल्पातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






