Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका…’; उत्तर कोरिया ट्रम्प प्रशासनावर भडकला, नेमकं कारण काय?

उत्तर कोरियाने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (3 फेब्रुवारी) अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2025 | 11:25 AM
North Korea slams US over direct criticism of Donald Trump administration

North Korea slams US over direct criticism of Donald Trump administration

Follow Us
Close
Follow Us:

प्योंगयांग: उत्तर कोरियाला  अमेरिकेचा मोठा शत्रू मानले जाते. रशिया-युक्रेनयुद्धामुळे हे शत्रुत्व अधिक वाढले होते. उत्तर कोरियाने या युद्धात रशियाला आपला पाठिंवा उघडपणे दर्शवला होता. मात्र, अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये संबंध  सुधारण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधला.मात्र आता पुन्हा एकदा हे संबंध बिघडण्याच्या  मार्गावर आहेत.

उत्तर कोरियाने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (3 फेब्रुवारी) अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या वक्तव्याचा निषेध केला. रुबियो यांनी उत्तर कोरियाला “दुष्ट राज्य” म्हणून संबोधले होते. यामुळे प्योंगयांगने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि अमेरिकेला इशारा दिला की अशा गंभीर आणि चूकीच्या वक्तव्यांमुळे त्यांचे हित साधले जाणार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हे’ आहेत 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य देश; जाणून घ्या भारत कितव्या क्रमांकावर?

उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्रालय

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे विरोधी शब्द आणि कृती दर्शवून देतात की, अमेरिकेची डीपीआरके (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया) बाबतची धोरणे पूर्वीप्रमाणेच आहेत आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.”

उत्तर कोरियाने हेही स्पष्ट केले की, मार्को यांचे वक्तव्य गंभीर आणि हास्यास्पद आहे. हे अमेरिकेच्या नव्या प्रशासनाच्या उत्तर कोरियाकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेला सावध करताना म्हटले की, “अशा वक्तव्यांमुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण होऊ शकतो.”

मार्को रुबियो यांच्या वक्तव्यावरून वाद

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एका मुलाखतीत उत्तर कोरिया आणि इराणला “दुष्ट राज्य” म्हटले होते. त्यांनी अमेरिकेसमोरील परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख आव्हानांबद्दल चर्चा करताना उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक देश संबोधले होते. यामुळे उत्तर कोरियाने या टीकेचा कडाडून विरोध केला आणि अमेरिकेच्या प्रशासनाची मानसिकता अद्याप बदललेली नाही, असे म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाशी पुन्हा संबंध प्रस्थापित करू इच्छितात

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाशी पुन्हा चर्चेचा प्रयत्न करत आहेत. आपल्या पहिल्या कार्यकाळात देखील त्यांनी उत्तर कोरियासोबत अनेक बैठकांचे आयोजन केले होते आणि दोन्ही देशांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. 23 जानेवारी रोजी एका मुलाखतीत ट्रम्प यांनी किम जोंग उन यांना “धार्मिक कट्टरतावादी नसून एक हुशार व्यक्ती” असे म्हटले होते. मात्र, उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आगामी काळात या वादाला कोणती दिशा मिळेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘दहशतवाद अन् ड्रग्ज…’, पाकिस्तानचे ‘हे’ षड्यंत्र झाले उघड, नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: North korea slams us over direct criticism of donald trump administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Kim Jong Un
  • North Korea
  • US

संबंधित बातम्या

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
1

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा
2

‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा

‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा
3

‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
4

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.