North Korea's Kim Jong Un's threat to Donald Trump over ‘Golden Dome’
प्योंगयोंग: सध्या जगभरात अशांततेचे वातावरण पसरलेले आहे. एकीकडे रशिया-युक्रेन संघर्ष सुरु आहे, तर दुसरीकडे इस्रायल, हमास आणि हुथींशी युद्ध लढत आहे.तिसरीकडे पाकिस्तान आणि भारतात तणापूर्ण वातावरण आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयाने उत्तर कोरियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारने, अमेरिकेच्या गोल्डन डोम निर्णयाचा विरोध केला आहे.
त्यांचा हा प्रयत्न युद्धपरिस्थिती निर्माण करण्याच्या असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर यामुळे अणु युद्ध भडकण्याची शक्यता आहे.उत्तर कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, किम जोंग उन यांचे सरकार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्डन डोम योजनेवर नाराज आहे. अमेरिकेने हा निर्णय त्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतला आहे. भविष्यात अमेरिकेवर कोणताही हवाई हल्ला होऊ नये यासाठी अवकाशात शस्त्र तौनात करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.
परंतु उत्तर कोरियाचे हुकूमशाह यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय मागे घेण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकन सरकारने निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. किम जोंग उनच्या मते, ट्रम्प अमेरिकेचे वर्चस्व वाढवण्यासाठी जगाला धोक्यात टाकत आहेत.
किम यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज होण्याचे सर्वात मोठी कारण म्हणजे अमेरिकेचे जपान आणि दक्षिण कोरियाशी असलेले संबंध आहे. अमेरिकेची गोल्डन डोम मोहीम यशस्वी झाल्यास दक्षिण कोरिया आणि जपानमद्ये ही प्रणाली लागू होऊ, असे किम जोंग उनला वाटत आहे. जपान आणि दक्षिण कोरिया उत्तर कोरियाचे सर्वात मोठे शत्रू आहेत.
तसेच उत्तर कोरियाकडे आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा आहे, पण अमेरिकेचे गोल्डन डोम योजना उत्तर कोरियासाठी धोका निर्माण करणारी आहे. यामुळे उत्तर कोरियाच्या किम सरकारने ट्रम्प यांना निर्णय मागे घेण्याची धमकी दिली आहे. तसेच यामुळे जपानवर हल्ले करण्यासही उत्तर कोरियाला अडचणी निर्माण होतील. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाची जपानवर पकड कमकुवत होईल. यामुळे किम जोंग उन यांनी अमेरिकेला अणुयुद्धाची धमकी दिलेली आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला केवळ उत्तर कोरियाच नव्हे तर चीनने, रशियाने देखील तीव्र विरोध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रकल्पामुळे रशियाची चिंता वाढली आहे. तर चीनने याला थेट विरोध करत ट्रम्प यांचा हा प्रकल्प जागतिक स्थिरतेसाठी धोकादायक असल्याचे म्हणत निर्णय मागे घेण्यास सांगितले आहे.