Now the Iran-Israel war is raging again Israeli blueprint ready what will be the first target
Iran Israel conflict :जगभराचे लक्ष वेधून घेतलेल्या इराण-इस्रायल संघर्षात पुन्हा एकदा तापमान चढू लागले आहे. जून महिन्यात अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ अंतर्गत इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर जोरदार हल्ला केला होता. इस्फहान, फोर्डो आणि नतान्झ ही ठिकाणे लक्ष्य करत अमेरिकेने दावा केला होता की या भागांत मोठे नुकसान घडवून आणण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले की, ही ठिकाणे ‘पूर्णपणे नष्ट’ झाली आहेत. मात्र आता इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे इराणचे अणुकार्यक्रम पूर्णपणे संपलेले नाहीत!
विशेषतः इस्फहान येथील अणुसुविधेबाबत नवे खुलासे समोर आले आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात समृद्ध युरेनियम साठवलेले आहे, जे भविष्यात इराण पुन्हा अणुशक्ती निर्माण करण्यासाठी वापरू शकतो. एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे युरेनियम अजूनही ‘सक्रिय स्थितीत’ असून, योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचा उपयोग शक्य आहे. या पार्श्वभूमीवर, इस्रायल सरकारने नव्या हल्ल्याचे ब्लूप्रिंट तयार केल्याचे समजते. जर इराणने युरेनियम पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला, तर ‘इस्फहान’ हेच पहिले लक्ष्य ठरणार आहे, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता NASA वरही ट्रम्प सावट! 2000 लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, वैज्ञानिक प्रकल्पांवर संकट
इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांना दिलेल्या मुलाखतीत इराणला मोठे नुकसान झाल्याचे कबूल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक प्रभावित अणुठिकाणी इराणी अधिकारी अजून पोहोचलेले नाहीत. यावरून हल्ल्यांचे गांभीर्य स्पष्ट होते.
इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) सोबत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असली, तरी सध्या कोणत्याही अणुठिकाणाची तपासणी परवानगी दिलेली नाही. हे इशारा देणारे संकेत आहेत की इराण अजूनही काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि इस्रायलला हे अजिबात मान्य नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : असीम मुनीर राष्ट्रपती होणार? पाकिस्तान सरकारचा सत्तापालटाच्या अफवांवर धक्कादायक खुलासा
या घडामोडींवरून हे स्पष्ट होते की इराण आणि इस्रायलमधील संघर्ष केवळ थांबलेला नाही, तर आता पुन्हा नव्या जोमाने पेटू शकतो. इस्रायलने इस्फहानसाठी आपले हल्ल्याचे नियोजन पूर्ण केल्याचे दिसते आणि यावेळी कोणताही गुप्तचार, कोणतीही हालचाल जागतिक माध्यमांच्या नजरेपासून दूर राहणार नाही.