NYT's claims Pakistan was going to launch a nuclear attack on India
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये 10 मे रोजी चार दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी संघर्षावर विराम लागला. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर बारत आणि पाकिस्तानमद्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मध्यस्थीसाठी ट्रम्प यांचे आभार मानले होते. परंतु अद्याप दोन्ही देशात युद्धाबाबत अनिश्चितता कायम आहे.
याच वेळी न्यू यॉर्क टाइम्सच्या (NYT) एका दाव्याने खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला आहे की, पाकिस्तान भारतावर अणु हल्ल्याच्या तयारीत होता. परंतु अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे हा हल्ला टळला.
न्यू यॉर्क टाइम्सच्या दाव्यानुसार, सुरुवातील अमेरिकेला भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात कोणताही रस नव्हता. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी भारत आणि पाकिस्तानच्या लढाईत कोणताही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिका केवळ भारत आणि पाकिस्तानला शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन करत होता. परंतु दोन्ही देशांमधील तणाव उग्र होत चालला होता.
पाकिस्तानकडून भारताला अणु ह्ल्ल्याची धमकी दिली जात होती. यामुळे दोन अणुशक्ती देशांमध्ये युद्ध झाल्यास मोठ्या नुकसानीची भीती दक्षिण आशियामध्ये निर्माण झाली होती. याच भीतीमुळे ट्रम्प प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान युद्धात हस्तक्षेप केला.
न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये हवाई युद्ध सुरु झाले होते. याअंतर्गत पाकिस्तानने आपल्या हवाई शक्तीचे प्रदर्शन केले. भारताच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानने ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादला लागून असलेल्या रावळपिडींतील नूर खान हवाई तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथला होता.
न्यू यॉर्क टाईम्सने अहवाला दिलेल्या माहितीनुसार, रावळपिडीं एअरबेस पाकिस्तानचा एक महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी पाकिस्तानी विमानाला इंधन पुरवठा केला जातो. हा भाग पाकिस्तानच्या मद्यभागी आहे. याठिकाणी अणुभट्टीची देखभाल आणि संरक्षण केले जाते. सुमारे 170 अणुबॉम्ब या ठिकाणी होते असा दावा अहवालात करण्यात आली आहे. या घटनेनंतरच पाकिस्तान आणि भारतमधील परिस्थिती आमकी बिघडली होती. यामुळे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला युद्धात मध्यस्थी केली.
न्यूयॉर्क टाईम्सने अहवालात असाही दावा केला आहे की, नूर कान एअरबेसवरील क्षेपणास्त्र हल्ला भारताचा पाकिस्तानला अणु हल्ल्याचा होता. पाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने पाकिस्तान भारतापुढे अणु हल्ल्यात कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली होती. अहवलानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक घेतली होती. ही कमिटी अण्वस्त्रे कधी आणि कशी वापरायची यावर निर्णय घेते. याच बैठकीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणु युद्धाची भीती निर्माण झाली होती.
NYT च्या अहवालानुसार, या घटनेनंतर अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान अणुशक्तीदेशांमधील तमाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला. अहवालानुसार, सौदी अरेबिया, यूएईने केलेले प्रयत्न अयश्वी ठरले. यामुळे ट्रम्प प्रशासनाची देखील चिंता वाढली होती. याच वेळी ट्रम्प यांनी जेडी वेंस यांनी पंतप्रधान मोदींना फोन करम्यास सांगितले. जेडी वेंस यांनी पंतप्रधान मोदींना चर्चेदरम्यान हल्ल्यांच्या पर्यायांवर विचार करण्याची विनंती केली.. यानंतर पंतप्रधान मोदींनी या प्रसावाला सहमती दर्शवली परंतु भूमिका स्पष्ट केली नव्हती.