
'Osama bin Laden escaped disguised as a woman, says Ex CIA officer
Osama Bin Laden : नवी दिल्ली : जगभरात दहशतवाद पसरवणारा ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. नुकतेच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दाव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. CIA एजंट जॉन किरियाकौ यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार एका महिलेच्या वेशात पळून गेला होता.
नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्याकडून भारताचे कौतुक ; PM मोदींकडे केली ‘ही’ खास मागणी
जॉन किरियाकौ यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी तब्बल १५ वर्षे CIA मध्ये काम केले आहे, तसचे त्यांनी पाकिस्तानच्या अँटी-टेरर ऑपरेशन्सचेही नेतृत्त्व केले आहे. त्यांनी सांगितले की, ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील भीषण हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानच्या अल-कायदा ठिकाणांवर करावाई सुरु केली होती. परंतु त्यांनी हल्ला केला नाही.
यावेळी त्यांनी आणि त्यांच्या टीमने महिनाभर योजना आखून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. यानंतर त्यांनी दक्षिण आणि पूर्व अफगाणिस्तानच्या पाश्तो भागांवर हल्ला सुरु केला होता. त्यांनी म्हटले की, अमेरिकेच्या सैन्याने तोरा बोरा पर्वताजवळ ओसामा बिन लादेलना जवजवळ पूर्णपण घेरले होते.
पण जॉन यांना कल्पना नव्हते की, त्यांच्या संस्थेत एक सेंट्रल कमांडरचा अनुवादक अलक-कायदाच्या एजंट घुसला होता. त्याच्यामुळेच लादेनला त्यांच्या प्लॅन कळाला आणि त्याला पळून जाण्याची संधी मिळाली. त्यांनी म्हटले की, लादेनला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते. यानंतर त्याने ट्रान्सलेटरच्या माध्यमातून संदेश पाठवला. लादेनने रात्रीपर्यंतची वेळ मागितली होती. तसेच त्याने महिला आणि मुलांना बाहेर काढयच्या बहाणा दिला.
तसेच जनरल फ्रॅंक्स यांनीही लादेनची विनंती मान्य केली. मात्र अंधाराचा फायदा घेतला लादनेने बुराखा घातला आणि तिथून पळ काढला. तो पाकिस्तानमध्ये पळून गेला.जॉन यांनी म्हटले की, जेव्हा त्यांच्या सैन्याने सकाळी शोध घेतला तेव्हा तोरा बोरा पूर्णपणे रिकामा झालेला होता. तिथे एकही अल-कायदा दहशतवादी नव्हता. सध्या या खुलाश्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा ९/११ च्या हल्ल्याची आणि ओसामा बिन लादेनची चर्चा सुरु झाली आहे.
प्रश्न १. ओसामा बिन लादेन बाबत काय दावा करण्यात आला?
CIA एजंट जॉन किरियाकौ यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, दावा केला आहे की, ओसामा बिन लादेन एका महिलेच्या वेशात पळून गेला होता.
प्रश्न २. कसा पळून गेला ओसामा बिन लादेन?
अमेरिकन सैन्याने तोरा बोरा पर्वत रांगामध्ये लादेनला घेरले होते, त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. यावेळी लादेनने रात्रीपर्यंतची वेळ मागितली होती. तसेच त्याने महिला आणि मुलांना बाहेर काढयच्या बहाणा दिला. आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अमेरिकन सैन्याला चकवा दिला.
नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! खोल दरीत कोसळली जीप कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू