Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Crisis: ‘भारतासोबतच्या संबंधांवरच अवलंबून आहे आपली समृद्धी’ Sheikh Hasina यांनी Yunus ला हिंसेवर सुनावले खडे बोल

Sheikh Hasina interview on Bangladesh crisis : बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार घडत आहे, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 22, 2025 | 11:35 AM
Our prosperity depends on good relations with India Sheikh Hasina criticizes Yunus over the situation in Bangladesh

Our prosperity depends on good relations with India Sheikh Hasina criticizes Yunus over the situation in Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:
  •  मोहम्मद युनूस हे नेते नाहीत, त्यांच्याकडे देश चालवण्याचा अनुभव नाही आणि त्यांनी मंत्रिमंडळात अतिरेक्यांना स्थान दिले आहे, अशी थेट टीका शेख हसीना यांनी केली.
  • बांगलादेशची समृद्धी आणि सुरक्षा ही केवळ भारतासोबतच्या मजबूत संबंधांवर अवलंबून आहे, भारतविरोधी घोषणाबाजी देशाच्या हिताची नाही.
  • बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारा हिंसाचार हा युनूस सरकारच्या अपयशाचे आणि अराजकतेचे जिवंत उदाहरण आहे.

Sheikh Hasina on Muhammad Yunus government failure : बांगलादेशातील(Bangladesh) राजकीय पेचप्रसंग आता एका अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. भारतात (India) आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रदीर्घ काळानंतर आपली चुप्पी तोडली आहे. ‘एएनआय’ला (ANI) दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवर अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशात सध्या सुरू असलेला हिंसाचार, अल्पसंख्याकांचा छळ आणि भारतविरोधी निदर्शने यावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून, “भारताशिवाय बांगलादेशचे अस्तित्व सुरक्षित नाही,” असा इशारा दिला आहे.

मोहम्मद युनूस: अनुभवाचा अभाव आणि कट्टरवाद्यांना थारा

शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्यावर थेट निशाणा साधताना म्हटले की, “युनूस हे राजकारणी नाहीत. त्यांना एक अत्यंत गुंतागुंतीचा देश चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. ते केवळ एक ‘चेहरा’ आहेत, ज्यांचा वापर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्वीकारार्हता मिळवण्यासाठी कट्टरपंथी लोक करत आहेत.” हसीना यांचा असा दावा आहे की, युनूस यांनी महत्त्वाच्या मंत्रिमंडळ पदांवर अशा व्यक्तींना बसवले आहे ज्यांची पार्श्वभूमी संशयास्पद आहे. एवढेच नाही तर, तुरुंगात असलेल्या घोषित दहशतवाद्यांना सोडून देऊन देशाच्या संस्थांना पद्धतशीरपणे कट्टरपंथी बनवले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh

‘चिकन नेक’ आणि भारतविरोधी विधाने बेजभाजदार

भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणाऱ्या ‘चिकन नेक’ (Siliguri Corridor) बाबत बांगलादेशातून अलीकडेच काही प्रक्षोभक विधाने समोर आली होती. यावर संताप व्यक्त करताना शेख हसीना म्हणाल्या, “अशी विधाने अत्यंत धोकादायक आणि बेजबाबदार आहेत. कोणताही शहाणा नेता आपल्या त्या शेजाऱ्याला धमकी देऊ शकत नाही ज्याच्यावर आपला व्यापार, वाहतूक आणि प्रादेशिक स्थिरता अवलंबून आहे.” भारताशी असलेले संबंध बिघडवणे म्हणजे बांगलादेशच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.

In an email interview with ANI, former Prime Minister of Bangladesh Sheikh Hasina speaks on the death of Osman Hadi, “This tragic killing reflects the lawlessness that uprooted my government and has multiplied under Yunus. Violence has become the norm while the interim government… pic.twitter.com/6YbPHnKbpq — ANI (@ANI) December 22, 2025

credit : social media and Twitter

अल्पसंख्याकांवरील हिंसाचार आणि अराजकता

बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या घरांची झालेली तोडफोड, जाळपोळ आणि हत्यांवर हसीना यांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “भारत ही सर्व अराजकता आणि आपण एकत्र बांधलेल्या धर्मनिरपेक्ष बांगलादेशचा विनाश पाहत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सीमेवर मूलभूत सुव्यवस्था राखू शकत नाही, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमची विश्वासार्हता संपते.” उस्मान हादी सारख्या युवा नेत्याची झालेली हत्या हे बांगलादेशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh: फेक न्यूजचा पर्दाफाश! बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार, दिले सडेतोड उत्तर

निवडणुकीवरून इशारा: ‘अवामी लीग’शिवाय लोकशाही नाही

येणाऱ्या निवडणुकांबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अवामी लीग हा देशातील सर्वात मोठा आणि नऊ वेळा निवडून आलेला पक्ष आहे. जर या पक्षावर बंदी घालून निवडणुका घेतल्या गेल्या, तर तो लोकशाहीचा उत्सव नसून केवळ ‘राज्याभिषेक’ असेल. “जर जनतेला त्यांच्या पसंतीच्या पक्षाला मतदान करता आले नाही, तर लाखो लोक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील आणि ते लोकशाहीसाठी घातक ठरेल,” असे हसीना म्हणाल्या. शेवटी, भारताने दिलेल्या आश्रयाबद्दल आणि भारतीय राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारताने दाखवलेला आदरातिथ्य हा त्यांच्यासाठी मोठा आधार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्याबद्दल काय म्हटले?

    Ans: हसीना म्हणाल्या की युनूस हे नेते नाहीत, त्यांना देश चालवण्याचा अनुभव नाही आणि ते कट्टरवाद्यांच्या हातातील खेळणे बनले आहेत.

  • Que: बांगलादेशच्या समृद्धीसाठी हसीना यांनी काय सुचवले?

    Ans: बांगलादेशची समृद्धी आणि सुरक्षा ही पूर्णपणे भारतासोबतच्या मजबूत आणि चांगल्या संबंधांवर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • Que: अवामी लीगबद्दल शेख हसीना यांनी कोणता इशारा दिला?

    Ans: जर अवामी लीगवर बंदी घालून निवडणुका घेतल्या गेल्या, तर त्या निवडणुका नसून केवळ एक 'राज्याभिषेक' असेल आणि लाखो लोक मतदानापासून वंचित राहतील.

Web Title: Our prosperity depends on good relations with india sheikh hasina criticizes yunus over the situation in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Bangladesh violence
  • Mohammad Yunus
  • sheikh hasina

संबंधित बातम्या

India Bangladesh: फेक न्यूजचा पर्दाफाश! बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार, दिले सडेतोड उत्तर
1

India Bangladesh: फेक न्यूजचा पर्दाफाश! बांगलादेशी मीडियाविरुद्ध MEA Randhir Jaiswal यांचा ‘नो नॉन्सेन्स’ वार, दिले सडेतोड उत्तर

‘ती’ अफवाच निघाली खोटी,ज्यामुळे DeepuDas बनला जमावशाहीचा बळी; Bangladeshमधील मॉब लिंचिंगमध्ये धक्कादायक खुलासा
2

‘ती’ अफवाच निघाली खोटी,ज्यामुळे DeepuDas बनला जमावशाहीचा बळी; Bangladeshमधील मॉब लिंचिंगमध्ये धक्कादायक खुलासा

Bangladesh Violence: हिंदू तरुणाच्या लिंचिंग प्रकरणी 10 जणांना अटक; भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली
3

Bangladesh Violence: हिंदू तरुणाच्या लिंचिंग प्रकरणी 10 जणांना अटक; भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली

Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh
4

Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.