Pahalgam Terror Attack Iran's Foreign Minister Araghchi's India-Pak visit amid tension
तेहरान: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे जगभरातील नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते आहे. पाकिस्तानकडून वारंवार अणुयुद्धाच्या धमक्या मिळत आहे. अमेरिकेपासून ते रशियापर्यंत अनेक देशांनी भारताला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या वाढत्या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची भारत-पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांशी संवाद साधून तमाव कमी करण्याचा त्यांच्या प्रयत्न राहील असे त्यांनी म्हटले आहे.
अराघची यांचा पहिला दौरा पाकिस्तानला असणार असून सोमवारी (06 मे ) ते पाकिस्तानला रवाना होतील. त्यानंतर पाकिस्तानचा दौरा पूर्ण करुन परराष्ट्र मंत्री अराघची नवी दिल्लीत देशाच्या उच्च अधिकाऱ्यांशी बैठक घेतील.
Watch For: #Iran ‘s Foreign Minister, Abbas Araghchi, is scheduled to visit Pakistan and India next week to discuss bilateral relations and regional developments. The de-escalation efforts are apparent across all of the leaders in the region.
— Alex Moffitt (@AlexandriaMoff5) May 4, 2025
याच दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींशी बोलताना पहलगमाच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी दहशतवादविरुद्ध संयुक्तपण एकत्र काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पेझेश्कियान यांनी हल्ल्याचा निषेध केला तर दहशतवादविरोधात लढादेण्यासाठी भारताला आपला पाठिंबा दर्शवला.
तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेत पेझेश्कियान यांनी वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच प्रादेशिक शांततेसाठी इच्छा व्यक्त केली.
दरम्यान असा प्रश्न उपस्थित होतो की, पाकिस्तान आमि भारतातील वाढता तणाव कमी करण्यासाठी इराण मध्यस्थीची भूमिका बजावू शकेल का? यामुळे दोन्ही देशांतील राग शांत होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच इराण नेमका कोणच्या बाजूने असेल हे देखील पाहण महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी पाकिस्तान उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांच्याशी चर्चा झाली. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी इराणने मध्यस्थीच्या भूमिकेसाठी तयारी दर्शवली. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची येत्या आठवड्याच्या अखेरीस भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तानातून वस्तूंची आयात-निर्यात देखील थांबवली आहे. शिवाय भारताने पाकिस्तानच्या विमानांसाठी हवाई हद्दीवर देखील बंदी घातली आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये भारताच्या लष्करी कारवाईची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तान कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पाकिस्तान जागतिक स्तरावर देखील मदतीसाठी भीक मागत आहे.