Russia-Ukraine War: '...त्याचा मृत्यू निश्चित आहे' ; रशिया विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्कींचे खळबळजनक विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कीव: एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे, तर दुसरीकडे तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेले युद्ध देखील दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या रशियाच्या विजय दिनानिमित्त पुतिन यांनी 8 मे ते 10 मे पर्यंत युद्धबंदीची घोषणा केली आहे. परतंयु याचवेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी गंभीर इशार दिला आहे. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार्या जागतिक नेत्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो असे म्हटले आहे.
तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की, या नेत्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी युक्रेन देऊ शकत नाही. झेलेन्स्की यांच्या या विधानानंतर जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी विजय दिनाच्या परडेला जागतिक शक्तीप्रदर्शनात रुपांतरित केले आहे. याची योजना आखण्याच आली असून जागतिक नेत्यांनी या परिषदेला जाऊ नये असा इशारा युक्रेनने दिला आहे.
रशियाच्या विजय दिनाच्या परेडदिनानिमित्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भारताचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील यासाठी उपस्थित राहणार आहे. शिवाय पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिक आमंत्रण दिले आहे, परंतु अद्याप त्यांच्या रशिया भेटीची कोणतीही अधिकृ पुष्टी झालेली नाही.
झेलेन्स्की सरकारच्या मते, सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीमध्ये आणि रशियाच्या युक्रेनविरोधात सुरु असलेल्या लष्करी कारवायांदरम्यान रशियाला जाणे योग्य नाही. हे मृत्यूला जाणूनबुजून आव्हान देण्यासाखे आहे. कोणत्याही नेत्याने रशियाला अशा परिस्थितीत जाऊ नये. युक्रेनने हेही स्पष्ट केली आहे की, जागतिक नेत्यांवर कोणताही हल्ला झाला तर युक्रेनच्या सरकारला दोष देता येणार नाही. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार, हा इशारा केवळ राजकीय संदेश नाही तर संभाव्य लष्करी कारवाईचे निर्देश आहेत.
झेलेन्स्की यांनी हा उशारा अशा वेळी दिला आहे, जेव्हा रशियाने युक्रेनवरील प्रदेशांवर ड्रोन हल्ले वाढवले आहेत. तसेच अलीकडच्या काही दिवसांत युक्रेनच्या अक प्रदेशांवर ताबा मिळवला आहे. अनेक सरकारी इमारती आणि लष्करी तळांना रशियन सैन्य लक्ष करत आहे.
दरम्यान युक्रेनच्या या इशाऱ्याकजे रशियाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा खराब करण्याच्या हेतूने पाहिले जात आहे. जागतिक नेत्यांना रशियापासून दूर ठेवून एक धोरणात्मक मानिक युद्धाची खेळी युक्रेन रचत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान हा प्रश्न निर्माण झाला आहे की, भारत, चीनसह इतर देश या इशाऱ्याला गांभीर्याने घेतात का? भारतासाठी हा प्रश्न राजनैतिक संतुलनाचा प्रश्न आहे. भारताचे गेल्या अनेक काळापासून रशिया राजनैतिक आणि धोरणात्मर संबंध अधिक चांगले आहे. यामुळे पाश्चिमात्त देशांच्या नरजारा भारताच्या भूमिकेवर आहेत. यामुळे रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये कोणते देश सहभागी होतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.