Pakistan again attack on afghanistan, claims killed dozens of taliban terrorist
Pakistan-Taliban Conflict : इस्लामाबाद / काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव अद्यापही कायम आहे. ४८ तासानंतर दोन्ही देशात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. नुकतेच पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या (Afghanistan) क्रिकेटपट्टूंवर हल्ला केला होता, ज्यामध्ये तीन अफगाण खेळाडू मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा एकदा हल्ल्याचे वृत्त समोर आले आहे.
Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला ‘एअर स्ट्राईक’; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू
आता पाकिस्तानने पुन्हा एकदा शनिवारी (१८ ऑक्टोबर) अफगाणिस्तानवर हल्ला केला असून अनेक तालिबानी दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने दावा केला आहे की, त्यांनी हल्ल्यात तालिबानच्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य कतेले होते.
या हल्ल्यात डझनभर दहशतवादी ठार झाले असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. परंतु या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्धबंदीच्या चर्चांना धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांच्या युद्धबंदीनंतर काही तासांतच संघर्ष सुरु झाला आहे.
शिवाई पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या क्रिकेटपट्टूंवरही हल्ला केला होता. यामध्ये तीन क्रिकेटपट्टूंचा मृत्यू झाला. सामना संपल्यानंतर खेळाडू घरी परतत असताना त्यांच्यावर बॉम्बहल्ला झाला होता. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. तसेच पाकिस्तानने अफगाणच्या पक्तिका प्रांतातील तीन ठिकाणी बॉम्बहल्ला केला. खेळाडूंवरील हल्ल्यात दहा नागरिकही ठार झाले आहेत, तर 12 जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे, परंतु काबुलने हा दावा फेटाळून लावला आहे. शनिवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले, तेव्हा सीमापार हिंसाचारात नाट्यमय वाढ झाली.
त्यांच्या आगमनानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये स्फोट झाले. त्यानंतर तालिबानने पाकिस्तानला लागून असलेल्या दक्षिण सीमेच्या काही भागात हल्ले सुरू केले, ज्याला इस्लामाबादकडून तीव्र प्रतिसाद मिळाला.
प्रश्न १ . पाकिस्तानने अफगाणिस्तानबाबत काय दावा केला आहे?
पाकिस्तानने दावा केला आहे की, त्यांनी पुन्हा अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात डझनभर तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत.
प्रश्न २. पाकिस्तानने अफगाणिस्तानवरील हल्ल्यात कशाला लक्ष्य केले?
पाकिस्तानच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.
प्रश्न ३. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये का सुरु आहे संघर्ष?
पाकिस्तानच्या मते, अफगाणिस्तानने त्यांच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम सीमांवर अफगाण सैन्याकडून हल्ला करण्यात आला होता यामुळे त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही हल्ला केला आणि संघर्ष सुरु झाला.
प्रश्न ४. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे कारण काय?
२०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे.
पाकिस्तानच्या लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला; चकमकीत चार दहशतवादी ठार केल्याचा सैन्याचा दावा