पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान (Pakistan) आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. परंतु यानंतर दहशतवादी ठिकाणे आणि दहशतवाद्यांना पुन्हा खतपाणी मिळू लागली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैश आणि लष्करच्या गुप्त बैठकीत हाफिज सईदचा मुलगा तल्हाही सहभागी झाला होता. या दहशतवादी संघटनांनी युती केली असून भारतावर मोठ्या हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या दहशतवादी अड्डावर टॉप दहशतवादी एकत्रित दिसले आहे. मंगळवारी बहावलपूर येथे एका मठ्या मदरशामध्ये बैठक झाली असल्याचे सुत्रांनी म्हटले. बहावलपूर हा जैश-ए-तैयबाचा बालेकिल्ला मानला जातो. मसूद अझहरचा मुख्य तळ देखील याच परिसरात आहे. या बैठकीत हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद, LeT चा प्रमुख सैफुल्लाह कसुरी आणि हाफिज अब्दुल रौफ हे टॉप दहशतवादी या बैठकीत हेते. या बैठकीनंतर भारतीय सैन्य हाय अर्लटमोडवर आले आहे.
सुत्रांच्या मते, सर्व दहशतवादी ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी एकत्र जमले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांसाठी भरती देखील करुन घेतली जात आहे. यामध्ये महिला आणि मूलाचांही समावेश आहे. तसेच जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि दशतवादी रौफ सागर भारतावर हल्ल्याची तयारी करत असल्याचे गुप्तचर सुत्रांनी म्हटले आहे. यामुळे भविष्यात भारतावर IED हल्ला होऊ शकतो, ज्यामुळे सध्या भारताची चिंता वाढली आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा मोठा हात आहे.
काही दिवसांपूर्वी हाफिज सईदचा अशाच एका गुप्त बैठकीदरम्यानच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने भारतामध्ये पुन्हा हल्ला करण्याची हिंमत्त नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी भारताने कारवाई केल्यास त्याला उत्तर दिले जाईल असेही चिथावणीखोर विधान केले होते. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना यावरुन कडक इशाराही दिला आहे. भारत कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कृत्य, घुसखोरी स्वीकारणार नाही, असे भारताने म्हटले आहे.
‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sindoor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO






