Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज सकाळी तीन मोठे स्फोट झाल्याचे समोर आले. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर काही तासांतच या घटना घडल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 07:18 AM
Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

Follow Us
Follow Us:

काबुल : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगानिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेल्याचे पाहिला मिळत आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज सकाळी तीन मोठे स्फोट झाल्याचे समोर आले. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर काही तासांतच या घटना घडल्या. सीमेपलीकडे वाढत्या लष्करी तणावादरम्यान या स्फोटांमुळे राजधानीतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

सध्या दोन्ही शेजारील देशांमधील सीमेवरील परिस्थिती आधीच अस्थिर आहे. अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी लष्करी कारवाईचा दावा केला आहे. उपप्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, खोस्त प्रांतातील अलिशेर-तेरेझी जिल्ह्यातील बाबरक चौकीअंतर्गत अंजार सार परिसरात स्थित पाकिस्तानी राजवटीचे मुख्यालय ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत डझनभर पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. तर अफगाण सैन्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत केल्याचे म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

दरम्यान, डुरंड रेषेवर एक मोठी प्रति-लष्करी कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई २०३ मन्सूरी कॉर्प्स आणि २०१ खालिद बिन वालीद कॉर्प्सकडून पक्तिया, पक्तिका, खोस्त, कुनार, नुरिस्तान आणि नांगरहार प्रांतातील अनेक भागात तसेच तोरखम गेटवर केली जात आहे. आतापर्यंत एक मुख्यालय आणि १९ चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. चार चौक्या रिकामी करण्यात आल्या आहेत आणि पूर्णपणे जाळण्यात आल्या आहेत.

ड्युरंड रेषेवर तणाव वाढला

सीमेच्या दुसऱ्या भागात असलेल्या तोरखम येथेही दोन्ही देशांमधील जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सीमेजवळील निर्वासित छावण्या रिकामी केल्या, तर पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या गावकऱ्यांनाही स्थलांतरित करण्यात आले. वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून डागण्यात आलेल्या मोर्टार शेलमुळे काही पाकिस्तानी गावांना फटका बसला.

ड्युरंड रेषा बनतोय वादाचा विषय

ड्युरंड रेषा म्हणून ओळखली जाणारी २६११ किलोमीटर लांबीची सीमा बऱ्याच काळापासून वादाचा विषय आहे. अफगाणिस्तानने ती औपचारिकपणे मान्य केलेली नाही. अलिकडच्या काही महिन्यांत या भागात अनेक गोळीबार आणि चकमकी झाल्या आहेत.

Web Title: Pakistan attacks afghanistan again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • international news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर
1

Maharashtra Live Breaking News in Marathi:ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र; मुंबईचा पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
2

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.