
Maharashtra Breaking News Today 13.10.2026
13 Oct 2026 10:45 AM (IST)
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, नंदुरबार येथे ३८.९ अंश, हर्णे येथे ३८.५ अंश, मालेगाव येथे ३८.४ अंश, तर मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात तापमानाचा उच्चांक अनुभवायला मिळू शकतो. काही ठिकाणी पारा ३९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
13 Oct 2026 10:35 AM (IST)
फोन चोरी झाल्यानंतर सर्वात पहिले काम म्हणजे तुमचे सिम कार्ड त्वरित ब्लॉक करा. कारण आजच्या काळात बँक अकाऊंट्स, यूपीआय ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या नंबरला लिंक केलेले असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही सिम कार्ड ब्लॉक केले नाही तर तुमचा फोन चोरी करणारी कोणतीही व्यक्ती ओटीपी मिळवू शकते आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करू शकते.
तुमच्या नावाने, तुमच्या नंबरवरून फोन किंवा मेसेज करून लोकांची फसवणूक देखील केली जाऊ शकते. यामुळे फोन चोरी झाल्यानंतर त्वरित तुमच्या सर्विस प्रोवाइडर म्हणजेच एयरटेल, जियो, वोडाफोन-आइडिया किंवा बीएसएनएलच्या कस्टमर केयरला कॉल करा. त्यांना सर्व परिस्थिती सांगा आणि त्यांना तुमचे सिम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा.
13 Oct 2026 10:28 AM (IST)
‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, रणवीर सिंहने खरेदी केलेली कार BMW i7 50 xDrive M Sport ही आवृत्ती असल्याचे मानले जात आहे. BMW च्या फ्लॅगशिप 7 सिरीजची ही पूर्णपणे इलेक्ट्रिक सेडान आहे. आलिशान डिझाइन, दमदार कामगिरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
13 Oct 2026 10:10 AM (IST)
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या सोमवारी पार पडलेल्या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने शानदार विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जय पवार यांच्या रणनीतीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनलने सर्वच्या सर्व २१ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.या निवडणुकीत जय पवारांच्या राजकीय नियोजनाने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
13 Oct 2026 10:00 AM (IST)
Voter List Revision Deadline Extended: मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने नागरिकांना मोठा दिलासा देत मुदतवाढ दिली आहे. आता पात्र नागरिक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले दावे व हरकती दाखल करू शकणार आहेत.
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६
दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया: ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६
अंतिम मतदार यादी जाहीर होणारी तारीख: १६ नोव्हेंबर २०२६
प्रारूप मतदार यादीमध्ये आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करा.
तुमचे नाव वगळले असल्यास ते समाविष्ट करण्यासाठी, नोंदीमध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी संबंधित अर्ज नक्की दाखल करा.
13 Oct 2026 09:50 AM (IST)
भारतीय संघाचा धडाकेबाज क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आश्चर्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची आणि साखरपुडा मोडल्याची चर्चा होती, मात्र आता या दोन्ही स्टार्सनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
साधारणतः महिनाभरापूर्वीच पृथ्वी शॉ आणि आकृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपापले रस्ते वेगवेगळे झाल्याचे आणि साखरपुडा मोडल्याचे जाहीर केले होते, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता मीडिया रिपोर्ट्सनुसार या जोडगोळीचे पॅचअप झाले असून ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
13 Oct 2026 09:40 AM (IST)
मुंबई महापालिकेच्या बँकांमधील मुदत ठेवी (Fixed Deposits) अवघ्या ८ महिन्यांत ८१ हजार ४४९ कोटी रुपयांवरून घसरून थेट ७७ हजार ९०५ कोटी रुपयांवर आल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या ठेवींना एकूण ३,५४४ कोटी रुपयांची गळती लागली आहे. दुसरीकडे, शहरात सुरू असलेल्या आणि नियोजित पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी महापालिकेवर तब्बल २ लाख ३४ हजार कोटी रुपयांची दायित्वे (Liabilities) आहेत.ठेवींची सातत्याने होणारी घट आणि प्रकल्पांचा वाढता खर्च पाहता, आगामी काही वर्षांत महापालिकेसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण होण्याचा इशारा एका वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्याने दिला आहे.
13 Oct 2026 09:30 AM (IST)
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठे वळण समोर आले आहे. पोलिसांनी सर्व मारेकऱ्यांना अटक केल्याचा दावा केला असला, तरी खुद्द पुर्णेकरांच्या मुलानेच पोलिसांच्या तपासावर आणि पकडलेल्या आरोपीबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी चार जणांनी कार्यालयात घुसून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि प्रयागराजमधून हेल्मेटधारी मारेकऱ्याला ताब्यात घेतले होते. तपासात हेल्मेटधारी मारेकऱ्याचे नाव अमित सिंग असल्याचे समोर आले होते, ज्याने गुन्हा करताना हेल्मेट घातल्यामुळे सुरुवातीला त्याची ओळख पटणे कठीण झाले होते.
13 Oct 2026 09:23 AM (IST)
Essential Commodities Inflation India: सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्के इतका वाढण्यामागे अन्नपदार्थांच्या वाढत्या किंमती हे मुख्य कारण ठरल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे.
गेल्या वर्षभरात स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या ४२ पैकी तब्बल ४१ वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून, केवळ बटाटा वगळता इतर सर्वच वस्तू महंभागाच्या फेऱ्यात अडकल्या आहे. कांद्याच्या दरामध्ये थेट ११३ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली असून, महाराष्ट्रातील दुष्काळामुळे कांदा आणखी महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra to World Breaking News :
राज्यात मान्सूननंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा तीव्र झाला असून मुंबईत सांताक्रूझ येथे पारा ३८.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने गेल्या १३ वर्षांतील दुसऱ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ प्रक्रियेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’ आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सूत्रे सलामीवीर स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आली असून युनिसेफ (UNICEF) इंडियाने तिची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती केली. अकोला शहरात अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ३५ ते ४० ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई करण्यात आली.
पावसामुळे चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने मराठवाडा व नाशिक विभागातील मेंढपाळांवर मेंढ्यांच्या जगणुकीसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे विजेची मागणी ३० हजार मेगावॉटवर पोहोचल्याने राज्यातील काही ग्रामीण व शहरी भागांत भारनियमन लागू करण्यात आले.