२०३२ मध्ये चंद्रावर एक लघुग्रह आदळू शकतो, ज्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Asteroid 2024 YR4 Moon impact 2032 : ब्रह्मांडात घडणाऱ्या हालचाली मानवी जीवनावर किती मोठा परिणाम करू शकतात, याचा एक धक्कादायक खुलासा नुकताच झाला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी ‘२०२४ YR४’ या लघुग्रहाबाबत (Asteroid) एक गंभीर इशारा दिला आहे. हा लघुग्रह २२ डिसेंबर २०३२ रोजी चंद्रावर धडकण्याची दाट शक्यता आहे. ही घटना केवळ चंद्रापुरती मर्यादित नसून, तिचे पडसाद पृथ्वीवरील आधुनिक तंत्रज्ञानावर, विशेषतः इंटरनेट आणि संप्रेषण व्यवस्थेवर पडू शकतात.
२०२४ YR४ हा सुमारे ६० मीटर रुंद लघुग्रह आहे, ज्याचा आकार एखाद्या १० मजली इमारतीइतका आहे. सुरुवातीला हा लघुग्रह पृथ्वीवर आदळेल अशी भीती होती, मात्र ताज्या आकडेवारीनुसार आता त्याचे लक्ष्य ‘चंद्र’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ डिसेंबर २०३२ रोजी हा लघुग्रह चंद्रावर आदळण्याची शक्यता ४% आहे. जरी ही टक्केवारी कमी वाटत असली, तरी अंतराळ विज्ञानाच्या भाषेत हे प्रमाण अत्यंत चिंताजनक मानले जाते.
The impact probability of asteroid 2024 YR4 has dropped to 0.004%. It’s expected to safely pass Earth in 2032. Read the full update: https://t.co/wirnWv6FYE pic.twitter.com/AKXma5eVoT — NASA (@NASA) February 24, 2025
credit – social media and Twitter
चीनच्या सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधनानुसार, जर हा लघुग्रह चंद्रावर आदळला, तर त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही मध्यम आकाराच्या ‘थर्मोन्यूक्लियर’ (Thermonuclear) स्फोटासारखी असेल. या धडकेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर १ किलोमीटर रुंद आणि सुमारे २००-२५० मीटर खोल खड्डा तयार होईल. इतकेच नाही तर चंद्रावर ५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप देखील येईल, ज्यामुळे चंद्राची अंतर्गत रचना हादरून जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ISRO : जेव्हा रात्र भयाण झाली आणि नभ रक्तवर्णी; लडाखमध्ये जे घडलं ते पाहून शास्त्रज्ञही हादरले, ‘AdityaL1’ ठरले सुरक्षाकवच
या धडकेमुळे चंद्राचा कचरा आणि माती (Lunar Debris) वेगाने अवकाशात फेकली जाईल. या ढिगाऱ्याचा काही भाग पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. शास्त्रज्ञांच्या मते, हे छोटे कण पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना (Satellites) गोळीच्या वेगाने धडकू शकतात. जर मोठ्या प्रमाणात उपग्रह नष्ट झाले, तर ‘केसलर सिंड्रोम’ (Kessler Syndrome) नावाची साखळी प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये एका उपग्रहाचा कचरा दुसऱ्याला धडकेल आणि संपूर्ण उपग्रह प्रणाली उद्ध्वस्त होईल. याचा थेट परिणाम पृथ्वीवरील इंटरनेट, जीपीएस (GPS), बँकिंग आणि हवामान खात्याच्या कामावर होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक
धोक्यासोबतच ही घटना एक अद्भुत नजाराही घेऊन येईल. या धडकेनंतर काही दिवसांतच पृथ्वीच्या वातावरणात तासाला लाखो उल्का प्रवेश करतील. यामुळे दक्षिण अमेरिका, उत्तर आफ्रिका आणि अरबी देशांच्या आकाशात अतिशय तेजस्वी उल्कावर्षाव पाहायला मिळेल. शास्त्रज्ञ या लघुग्रहावर सध्या बारकाईने लक्ष ठेवून आहेत. २०२८ मध्ये जेव्हा हा लघुग्रह पुन्हा पृथ्वीच्या जवळून जाईल, तेव्हा त्याच्या कक्षेबद्दल अधिक अचूक माहिती मिळेल.
Ans: नाही. ताज्या संशोधनानुसार हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार नाही, मात्र तो २२ डिसेंबर २०३२ रोजी 'चंद्रावर' आदळण्याची ४% शक्यता आहे.
Ans: या धडकेमुळे उडणारा मलबा पृथ्वीच्या उपग्रहांना हानी पोहोचवू शकतो, ज्यामुळे इंटरनेट आणि नेव्हिगेशन सेवा विस्कळीत होऊ शकतात.
Ans: जेव्हा अवकाशातील कचरा वाढतो आणि तो एकापाठोपाठ एक उपग्रहांना नष्ट करतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या साखळी प्रक्रियेला केसलर सिंड्रोम म्हणतात.






