Israel-Iran War: डोळे उघडे ठेवा, मृत्यू जवळ आहे! दातात बसवली चिप अन् झाला घात; खामेनींच्या हत्येमागील 'सायबर स्ट्राईक'चा खुलासा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
How was Ayatollah Khamenei killed details : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या हत्येनंतर आता संपूर्ण जगात एकच चर्चा सुरू आहे – “जगातील सर्वात कडक सुरक्षा कवच भेदून अमेरिका आणि इस्रायलने खामेनींना गाठलं कसं?” या ऑपरेशनची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात असली तरी, सोशल मीडिया आणि पाश्चात्य माध्यमांमध्ये अशा काही थिअरीज समोर येत आहेत ज्या एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकतील. मोसाद आणि सीआयएच्या या संयुक्त कारवाईत तंत्रज्ञानाचा आणि मानवी हेरगिरीचा असा वापर करण्यात आला आहे, ज्याने इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत.
सर्वात विश्वासार्ह आणि धक्कादायक दावा म्हणजे तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेऱ्यांचे हॅकिंग. ‘फायनान्शिअल टाईम्स’च्या वृत्तानुसार, इस्रायलने तेहरानचे जवळजवळ सर्व ट्रॅफिक कॅमेरे वर्षानुवर्षे हॅक केले होते. या कॅमेऱ्यांचा सर्व डेटा थेट तेल अवीवमधील सर्व्हरला जोडलेला होता. यातून खामेनींचे अंगरक्षक गाड्या कुठे पार्क करतात, ते कोणत्या मार्गाने प्रवास करतात आणि खामेनींच्या दैनंदिन सवयी काय आहेत, याची इत्यंभूत माहिती इस्रायलकडे होती. एका विशिष्ट कॅमेरा अँगलमुळे खामेनींचे नेमके ठिकाण हल्ल्याच्या काही मिनिटे आधी निश्चित करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Obesity Day 2026: वाढतं वजन, वाढतं टेन्शन! जागतिक स्थूलता दिनी जाणून घ्या वजन कमी करण्याचे ‘हे’ जादुई उपाय
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सध्या एक अत्यंत विचित्र पण रंजक दावा व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार, मोसादने आपले एजंट डॉक्टर आणि दंतवैद्यांच्या वेशात इराणमध्ये पाठवले होते. या एजंट्सनी उपचाराच्या बहाण्याने इराणच्या सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेत्यांच्या दातांमध्ये अत्यंत सूक्ष्म ‘ट्रॅकिंग चिप्स’ बसवल्या. इतकेच नाही तर काही गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टनी पोटात तपासणीच्या नावाने अशीच उपकरणे बसवल्याचा आरोप केला जात आहे. जरी या दाव्याला ठोस पुरावा नसला तरी, ‘मोसाद’ची कार्यपद्धती पाहता इंटरनेटवर याला मोठी पसंती मिळत आहे.
🚨 DECLASSIFIED: HOW THE STRIKE ON IRAN’S SUPREME LEADER HAPPENED Months of CIA and Mossad intelligence tracked movements, intercepted communications, and mapped the compound in Tehran. When the window opened, U.S. strikes knocked out Iran’s air defenses. Then 200 Israeli jets… pic.twitter.com/5O3dNC3tzu — Mossad Commentary (@MOSSADil) March 4, 2026
credit – social media and Twitter
रेडिटवरील एका थ्रेडमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कुद्स फोर्सचे कमांडर इस्माइल कानी हेच अमेरिका आणि इस्रायलसाठी खबऱ्या म्हणून काम करत होते. या दाव्यानुसार, ज्या इमारतीवर हल्ला झाला, तिथून कानी काही वेळ आधीच बाहेर पडले होते. कानी यांच्यावर मोसादशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू असल्याची चर्चा असली तरी इराणने यावर मौन पाळले आहे. आपल्याच जवळच्या माणसाने गद्दारी केल्याशिवाय खामेनींसारख्या व्यक्तीला मारणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
इस्रायलने केवळ लष्करीच नाही तर मानसिक युद्धही (Psychological Warfare) पुकारले होते. ५० लाखांहून अधिक डाऊनलोड्स असलेल्या इराणच्या “बदा सबा” या प्रार्थना ॲपला हॅक करण्यात आले. या ॲपद्वारे इराणी जनतेला “हिशेब घेण्याची वेळ आली आहे” असे संदेश पाठवण्यात आले. त्याचवेळी इराणच्या IRNA आणि ISNA सारख्या प्रमुख सरकारी वेबसाइट्स हॅक करून तिथे इस्रायलचे वर्चस्व दाखवणारे कंटेंट प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे इराणच्या सायबर सुरक्षेचे पूर्णपणे वाभाडे निघाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-Iran War: इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा भीषण बॉम्बहल्ला; 787 लोकांचा करुण अंत
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’वर खामेनींना “इतिहासातील सर्वात वाईट व्यक्ती” संबोधत या कारवाईचे समर्थन केले आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे हाच या हत्येमागचा मुख्य उद्देश होता, असे बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. आता हे ऑपरेशन ‘पेगासस’ सारख्या स्पायवेअरमुळे यशस्वी झाले की दातात बसवलेल्या चिप्समुळे, हे गुपित कदाचित कधीच बाहेर येणार नाही, पण याने इराणच्या सत्तेचा पाया मात्र नक्कीच हादरवला आहे.
Ans: : होय, यामुळे लक्षित व्यक्तीचा अचूक मार्ग आणि वेळ कळते, ज्याचा वापर करून अचूक क्षेपणास्त्र हल्ला करता येतो.
Ans: हे इराणमधील सर्वात लोकप्रिय प्रार्थना वेळ आणि कॅलेंडर ॲप आहे, ज्याचे ५० लाखांहून अधिक युजर्स आहेत.
Ans: हा सध्या रेडिटवरील एक दावा आहे, इराणने अद्याप अधिकृतपणे त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा पुष्टी केलेली नाही.






