Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

Rooppur Nuclear Plant : रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी रशियाकडून येणारी युरेनियमची खेप हवाई हद्दीच्या परवानगीच्या समस्यांमुळे अडकून पडली होती. नंतर, एक नवीन तारीख जाहीर करण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 28, 2026 | 11:44 AM
Rooppur Nuclear Power Plant Pakistan denies airspace to Russia

Rooppur Nuclear Power Plant Pakistan denies airspace to Russia

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा अविश्वासू पवित्रा
  • अणुऊर्जा प्रकल्पाचे काम रखडले
  • ऑक्टोबरमध्ये नव्या मार्गाने पुरवठा

दक्षिण आशियातील भू-राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. बांगलादेशात (Rooppur Nuclear Plant) नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आणि सत्तापालटानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला जुना अविश्वासू स्वभाव दाखवून देत बांगलादेशला मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशातील पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी’ (Rooppur Nuclear Power Plant) रशियाकडून येणारे युरेनियम रोखण्यासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली आहे. या घटनेमुळे बांगलादेशच्या ऊर्जा क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बांगलादेश आपल्या महत्त्वाकांक्षी ऊर्जा प्रकल्पांसाठी रशियाकडून युरेनियम इंधन खरेदी करतो. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट-२ साठी लागणारे अणुइंधन घेऊन रशियाचे विशेष मालवाहू विमान २४ सप्टेंबर रोजी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र, हे विमान रशिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या मार्गाने बांगलादेशात प्रवेश करणार होते. अगदी शेवटच्या क्षणी पाकिस्तानने या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी (Airspace Clearance) देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे युरेनियमची ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची खेप वेळेवर बांगलादेशात पोहोचू शकली नाही.

पाकिस्तानने का घेतला असा निर्णय? ऐतिहासिक वैमनस्य की आंतरराष्ट्रीय दबाव?

पाकिस्तानच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामागे कोणते कारण आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, २४ सप्टेंबर रोजी युरेनियम घेऊन येणाऱ्या विमानाला पाकिस्तानने अचानक हवाई हद्द नाकारल्याची माहिती त्यांना मिळाली. पाकिस्तानने असा निर्णय का घेतला, यामागचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, १९७१ च्या मुक्तीसंग्रामापासून बांगलादेशच्या प्रगतीबद्दल पाकिस्तानच्या मनात असलेला जळफळाट आजही कायम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, यामागे मोठे भू-राजकीय गणित असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. रशिया आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव पाहता, अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तानने ही हरकत घेतली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर पाकिस्तानमधील मूलतत्त्ववादी शक्तींनी बांगलादेशशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ऐनवेळी सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी बांगलादेशच्या विकासात अडथळा आणून पाकिस्तानने आपला मूळ चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे.

रशियाकडून नव्या तारखेची घोषणा; प्रकल्प बंद पडणार का?

युरेनियमचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे रुपपूर प्रकल्पाचे काम काही काळासाठी प्रभावित झाले आहे. जर बांगलादेशला लवकरच आवश्यक युरेनियम मिळाले नाही, तर प्रकल्पाच्या दुसऱ्या युनिटचे काम पुढे ढकलावे लागू शकते. बांगलादेशच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका विमानतळावर युरेनियमचे स्वागत करण्यासाठी आणि ते सुरक्षितपणे पबना जिल्ह्यातील प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

🇷🇺🇧🇩 Why is Russia building a nuclear plant in Bangladesh? The Rooppur Nuclear Power Plant is a $13 billion, 2.4 GW facility that will power roughly 10% of the country once operational. Russia is financing 90% of it through loans, but that money is almost beside the point.… pic.twitter.com/Z27uHKX46m — Mario Nawfal (@MarioNawfal) May 7, 2026

credit – social media and Twitter

मात्र, रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी ‘रोसाटॉम’ (Rosatom) या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोसाटॉमने बांगलादेश सरकारला आश्वासन दिले आहे की, पाकिस्तानची हवाई हद्द टाळून एका वेगळ्या आणि सुरक्षित मार्गाने युरेनियमची वाहतूक केली जाईल. रशियाच्या मते, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे युरेनियम बांगलादेशात सुरक्षितपणे पोहोचवले जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA : नासाने अंतराळात 6 वर्षे ठेवल्या टोमॅटोच्या 12.5 दशलक्ष बिया; जगभरातील शाळांमध्ये पेरणीनंतर समोर आले थक्क करणारे निष्कर्ष

रशियाच्या तांत्रिक मदतीने उभारला जातोय बांगलादेशचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प

बांगलादेशातील पाबना जिल्ह्यातील ईश्वरदी उपजिल्ह्यात पद्मा नदीच्या काठावर रुपपूर येथे हा भव्य अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. हा बांगलादेशचा सर्वात पहिला आणि महत्त्वपूर्ण अणुऊर्जा प्रकल्प आहे. रशियाची ‘रोसाटॉम’ कंपनी या प्रकल्पासाठी तांत्रिक साहाय्य पुरवत असून, ‘बांगलादेश अणुऊर्जा आयोग’ यावर पूर्ण देखरेख ठेवत आहे.

या प्रकल्पामध्ये तिसऱ्या पिढीतील (Gen-3+) २,४०० मेगावॅट क्षमतेच्या दोन VVER-1200 अणुभट्ट्या बसवल्या जात आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या युनिटसाठी लागणारे युरेनियम ऑक्टोबर २०२३ मध्येच रशियाकडून यशस्वीरीत्या आणण्यात आले होते. त्यावेळी बांगलादेशी सैन्याच्या कडक बंदोबस्तात ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करून हे इंधन प्रकल्पापर्यंत पोहोचवण्यात आले होते. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास बांगलादेशातील विजेची भीषण टंचाई कायमची दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या अशा कूटनीतिक खोड्यांमुळे बांगलादेशच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या स्वप्नाला तात्पुरता ब्रेक लागला आहे.

Web Title: Pakistan denies airspace russia bangladesh rooppur nuclear plant uranium delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
1

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
4

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.