Pakistan Diplomat of Bangladesh suddenly goes missing amid India-pakistan Conflict
ढाका: सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निव्वळत चालला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे बांगलादेशमधील राजदूत अचाक बेपत्ता झाले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने ढाक्यापासून ते इस्लामाबादर्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेय ढाका सोडल्यानंतर पाकिस्तानी राजदूत कुठे गेले असा प्रश्न उपस्तित केले जात आहे. त्यांनी राजनैतिक नियमांचे पालन केले नाही असे म्हटले जात आहे.
पाकिस्तानच्या दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील राजदूत सय्यद मारुफ अचानक बेपत्ता झाले आहे. त्यांच्या बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याची जबाबदारी होती. मारुफ यांना पाकिस्तान परराष्ट्र सेवेतील प्रभावशाली अधिकाऱ्यांमध्ये गणले जाते. त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडनमध्येही पाकिस्तानचे राजदूत म्हणून कार्य केले आहे.
बांगलादेशमधील पाकिस्तानचे राजदूत सय्यद मारुफ बेपत्ता होऊन दोन दिवस उलटले आहे. दरम्यान पाकिस्तानकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सध्या बांगलादेशमधील पाकिस्तानी दूतानवास मारुफ यांचा शोध घेत आहे.
पाकिस्तानच्या दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी राजदूत सय्यद मारुफ अचानक ढाका सोडून गेले. त्यांनी दूतावासाला किंवा बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाला कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे मारुफ कुठे गेले आणि का असे प्रश्न विचारले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा राजदूत देश सोडून जातो, तेव्हा त्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देणे आवश्यक असते. परंतु मारुफ यांच्या अनुपस्थितीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाकडे कोणतीही माहिती नाही.
शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर सय्यद मारुफ हे युनूस यांच्या सरकारमध्ये सर्वात सक्रिय राजदूत होते. त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध सुदारण्यावर भर दिला. तसेच त्यांच्यामुळे बांगलादेशने पाकिस्तानकडून तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा व्यापारी संबंध सुधारण्यावर चर्चा सुरु झाली होती. १९७१मध्ये भारताच्या मदतीने बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला होता.
भारतासोबतच्या तमावादरम्यान, बांगलादेशने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दर्शवला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार यांच्याशी दोन वेळा फोनवरुन संवाद देखील साधला होता. यावेळी बांगलादेशला पाकिस्तानने भारताने हल्ला केल्यास चिकन नेक वर चीनच्या मदतीने ताबा घेण्यास सांगितले होते. परंतु बांगलादेश सरकारने भारताविरोधात न जाण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने निवेदन जारी करत दोन्ही देशांना केवळ तणाव कमी करण्याचे आवाहन केले. तसेच युद्धबंदीनंतरही मोहम्मद युनूस यांनी भारत आणि पाकिस्तानच्या या निर्णयाचे स्वागत केले.