पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा (फोटो- ट्विटर
आदमपूर: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहालगाम हल्ल्याचा बदल घेतला आहे. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. काल रात्री देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधन केले. तर आज अचानक पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले.
आदमपूर एअरबेसवरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.”
Interacted with the air warriors and soldiers at AFS Adampur. Their courage and professionalism in protecting our nation are commendable. https://t.co/hFjkVIUl8o
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले.”
“कोणत्या प्रकारची अणुहल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. भारताची लक्ष्मण रेषा एकदम स्पष्ट आहे. पाकिस्तानने नागरी विमानांच्या मागून भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे हल्ले परतवून लावले. आता पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या पद्धतीने उत्तर देईल”, असे मोदी म्हणाले.
PM मोदी थेट ‘या’ एअरबेसवर दाखल; आता पाकड्यांच खरं नाही!
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी हे एअरबेसवर दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले. आदमपूर येथे भारताचे मिग 29 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या शूर जवानांचे कौतुक केले आहे.
PM मोदी थेट ‘या’ एअरबेसवर दाखल; आता पाकड्यांच खरं नाही! पुढचं पाऊल…
अखेर पाकिस्तानने मान्य केलंच…
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाकिस्तानने भारतीय सैन्याकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेल्याचे आणि ७८ सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केलं आहे. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानकडून मान्य करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषेवरून झालेल्या गोळीबारात लष्करी जीवितहानी व्यतिरिक्त अनेक नागरिकही जखमी झाले. आयएसपीआरच्या निवेदनानुसार, सात महिला आणि १५ मुलांसह ४० नागरिक ठार झाले, तर २७ मुले आणि १० महिलांसह १२१ जण जखमी झाले.