Pakistan faces a major threat of internal strife POK's threat on helping terrorist
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तान संकटाच्या विहिरीत अडकलेला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा पर्दाफाश होत आहे, तर दुसरीकडे बलुच आर्मीशी अंतर्गत संघर्ष वाढत आहे. अशातच पाकिस्तानच्या प्रमुख प्रांतांनी देखील दहशतवादी संघटनांविरुद्ध आवाज उठवला आहे. पाकव्याप्त काश्मीर (PoK) ने देखील ६६ दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. याअंतर्गत बकरी ईदला या दहशतवादी संघटनाना पैसे किंवा प्राणी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पाकव्याप्त काश्मीर भागाच्या (पीओके) सरकारच्या यादीत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांचा देखील समावेश आहे. या दहशतवादी संघटनांना बकरी ईद देणगी आणि प्राणी देण्यास पीओकेने बंदी घातली आहे. पीओके संबंधित निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात “भष्ट्राचार आणि दहशतवाद विरोधी कायदा २०१४ अंतर्त कोणत्याही व्यक्तीने,संस्थेने दहशतवादी संघटनांना देणगी किंवा प्राण्याची किंवा कोणतीही आर्थिक मदत कुन नये असे सांगण्यात आले आहे. कोणीही या दहशतवादी संघटनांना मदत केल्यास त्यांना १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असे निवेदनात सांगण्यात आले आहे.
गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानवर दहशतवादाला पोसल्याचा आरोप होत आहे. अनेक वेळा याचे पुरावेही समोर आले आहेत. तसेच अनेक वेळा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी देखील याची कबूली दिली आहे. यामुळे पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देतो हे सिद्ध झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पीओकेने शाहबाज सरकारलाही दहशतवादी संघटनांना मदत न करण्याची सथ्य्त ताकीद पीओकेने पाकिस्तानला दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बलुचिस्तानने आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत सुरु केली आहे. बीएलएने पाकिस्तानी लष्कराविरोधात बंड पुकारला आहे. पाकिस्तानी सरकारमुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे बलुच लोकांनी म्हटले आहे.
तसेच सिंध प्रांतातील लोक देखील बऱ्याच काळापासून पाकिस्तान सरकारवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे. सिंधी लोकांची ओळख आणि अधिकार पाकिस्तानने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारताने देखील जागतिक पातळीवर पुराव्यांसह पाकिस्तानाचा पर्दाफाश केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतान पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध केले आहे. यामुळे पाकिस्तानला आता तोंड दाखवण्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाही. पाकिस्तानचे शाहबाज सरकार आणि लष्कराचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.