पाक लष्करावर घातपात; बलुच विद्रोह्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ सैनिक ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तान गहिरे संकट उभे राहिले आहे. एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामाना करत आहे, तर दुसरीकडे अंतर्गत संघर्ष सुरु आहे. तसेच पाकिस्तानवर राज्य करणाऱ्या लष्करावर आता हळूहळू बलोच आर्मी नियंत्रण मिळवत आहे. गेल्या काही दिवसांपासून बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. बीएलएच्या सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराला गुडघे टेकायला मजबूर केले आहे. पुन्हा एक लष्करावर बीएलएने हल्ला चढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने पाकिस्तानी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ५ सैनिक ठार झाले आहेत. यामुळे बलुचिस्तान आता पाक लष्कराच्या हातातून निसटत चालले आहे. लष्कराला रोज मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, (बीएलए) आर्मीच्या सैनिकांना जमुरन आणि क्वेटा मध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले. या हल्ल्यात सैन्याच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. यात पाच सैनिकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह अनेकजण जखणी झाले आहे. बीएलएने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यातील दोन वाहन उद्ध्वस्त केली आहेत.
🚨 5 Occupying Pakistani Army Personnel Eliminated
Baloch Liberation Army (BLA) freedom fighters struck in Zamuran & Quetta, targeting Pakistan Army & sub-forces.
🎯 5 Eliminated
⚠️ Several Injured, incl. an officerBLA’s resistance for Baloch freedom continues.#Balochistan pic.twitter.com/8cMh1MGkKJ
— Baloch Bhaijaan (@Baloch_BhaiJaan) June 4, 2025
तसेच यापूर्वी सोमवारी ( २ जून) रोजी क्वेटा येथी असाच हल्ला केला होता. यामध्ये पोलिसांच्य वाहनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते.बलुच लिबरेशन आर्मीने दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. बीएलएने एक निवेदनात, बलुच लिबरेशन आर्मी दोन्ही कारवायांची जबाबदारी घेते असे म्हटले आहे. तसेच बीएलएने असेही स्पष्ट कले आहे की, जोपर्यंत लष्कर पूर्णपण माघार घेत नाही आणि राष्ट्रीय मुक्तता साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू. याशिवाय बीएलएने बलुचिस्तान प्रांतातील सुरब शहरावर नियंत्रण मिळवल्याचा देखील दावा केला आहे.
जानेवारीच्या सुरुवातीपासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बलुचिस्तानच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कर आणि शाहबाज शरीफ यांचा हात आहे. यामुळे बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य सैनिक आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे बलुचिस्तानने स्वतंत्र्य राज्यची मागणी केली आहे.