लष्कर पाकिस्तानात युक्त्या खेळेल! आयएसआय- मुनीरने लक्ष देण्यास नकार दिल्याने सत्तापालटाची भीती निर्माण झाली आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
General Asim Munir vs Lashkar-e-Taiba conflict : पाकिस्तान (Pakistan) सध्या अशा वळणावर उभा आहे जिथे त्याला शत्रूची गरज नाही. ज्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने (ISI) भारताच्या विरोधात वापरण्यासाठी जन्म दिला, आता त्या संघटना खुद्द पाकिस्तानच्याच मुळावर उठल्या आहेत. लष्कर-ए-तैयबा ( Lashkar-e-Taiba) या खतरनाक संघटनेने आता पाकिस्तान सरकारला “चोर” संबोधत उघडपणे बंडाचे निशाण फडकवले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लष्करी सत्तापालट (Coup) किंवा गृहयुद्धाची भीती निर्माण झाली आहे.
लष्कर-ए-तैयबाचा राजकीय मुखवटा असलेल्या ‘पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग’ (PMML) ने अलिकडच्या काळात आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत. या पक्षाचे नेतृत्व हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद पडद्यामागून करत आहे. या संघटनेचे कमांडर आता उघडपणे रॅली काढत असून पाकिस्तानच्या लोकशाही व्यवस्थेला आणि लष्करी नेतृत्वाला आव्हान देत आहेत. लाहोरमध्ये झालेल्या एका मोठ्या मेळाव्यात लष्करचा कमांडर मोहम्मद अशफाक राणा याने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर कडक शब्दात टीका केली.
मोहम्मद अशफाक राणा याने आपल्या भाषणात पाकिस्तान सरकारचा उल्लेख ‘चोर’ असा केला आणि पंजाब प्रांतातील परिस्थिती बलुचिस्तानसारखी अशांत करण्याचे संकेत दिले. “जर सरकारने आमचे ऐकले नाही, तर आम्ही पंजाबला बलुचिस्तान बनवू,” अशी धमकी या दहशतवादी कमांडरने दिली आहे. हे विधान केवळ धमकी नसून, पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे काढणारे आहे.
#BREAKING 👉🇵🇰
In a video message former TTP commander has stated their goal of establishing an “Islamic state” in Pakistan and wage Jihad against Pakistani establishment until it is achieved.
Asim Munir on the other hand has been after dollars from US and has given up… pic.twitter.com/iol6vu4qra — Ustād Yasir (@YasirAgha1234) January 9, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
पाकिस्तानात अनेक दशकांपासून ‘प्रॉक्सी वॉर’ खेळणाऱ्या आयएसआयची आता या दहशतवाद्यांवर पकड राहिलेली नाही. २०२५ मध्ये भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाले. यामुळे दहशतवादी संघटना संतापलेल्या आहेत आणि त्यांचे असे मानणे आहे की असीम मुनीर त्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणूनच, ज्या सापांना आयएसआयने दूध पाजले, ते आता जनरल मुनीर यांनाच चावण्यास तयार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर
पाकिस्तानातील सध्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यातच टीटीपी (TTP) आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांचे बंड पाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जात आहे. जर असीम मुनीर यांनी या संघटनांना रोखले नाही, तर हे दहशतवादी गट लष्करातील काही असंतुष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने सत्तापालट घडवून आणू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ७ जानेवारी रोजी युक्रेन आणि रशियाच्या मुद्द्यावर जगाचे लक्ष असताना, पाकिस्तानच्या अंतर्गत यादवीने आशिया खंडातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
Ans: हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा राजकीय चेहरा आहे, ज्याचा वापर करून दहशतवादी पाकिस्तानातील सत्तेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ans: भारताच्या लष्करी कारवाईनंतर (ऑपरेशन सिंदूर) दहशतवादी संघटनांचे नुकसान झाले, ज्याचा दोष ते लष्करी नेतृत्वावर लावत आहेत. तसेच त्यांना आता लष्कराचे नियंत्रण मान्य नाही.
Ans: आर्थिक संकट आणि अंतर्गत दहशतवादी बंडामुळे लष्करातील काही गट असंतुष्ट आहेत, ज्यामुळे सत्तापालटाची (Coup) शक्यता नाकारता येत नाही.






