pakistan news Baloch Liberation Army Pledges Support to India
इस्लामाबाद: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तमावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ७ मे ते१० पर्यंत दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला संघर्ष अखेर थांबला आहे. १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमोने चर्चा करुन युद्धविराम करण्यात आला आहे. दरम्यान भारतासोबतच्या युद्धबंदीच्या काळात बलुचिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानविरोधात मोठी घोषणा केली आहे. बलुच सैनिकांनी पाकिस्तानला आम्ही नष्ट करु असे म्हटले आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने खळबळ उडाली आहे.
याच वेळी बलुच सैनिकांनी भारताकडे देखील मोठी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बलुच सैनिकांनीा भारताकडे 3 गोष्टी मागतिल्या आहे. या गोष्टी मिळाल्या तर पाकिस्तानला नष्ट करु असा दावा बलुच सैनिकांनी केला आहे.
द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर बलुच सैनिकांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात बलुच सैनिकांनी म्हटले आहे की, पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो, त्यांच्याशी कोणतेही राजनैतिक संबंध ठेवणे मूर्खपणाचे आहे. जर भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे, तर पाकिस्तानविरुद्ध लढण्यास आम्हाला मदत करावी. आम्ही पाकिस्तानला योग्य धडा शिकवू असे बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे.
Baloch Liberation Army Pledges Support to India
In a powerful statement, BLA says if India strikes Pakistan, it will launch attacks from the western front
The group calls itself an independent national force — not a proxy — and labels Pakistan a “terrorist state” for… pic.twitter.com/CHDp18FGFx
— Nabila Jamal (@nabilajamal_) May 11, 2025
बीएलएने म्हटले आहे की, आम्हाला भारताकडून राजकीय, राजनैतिक आणि संरक्षण पाठिंबा मिळाल्यास आम्ही दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला पूर्णपण नष्ट करु. बीएलएने जगातील इतर देशांकडून देखील मदतीची मागणी केली आहे. बुलच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान पूर्णत: नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे, बीएलएने म्हटले आहे की, पाकिस्तानला संपवले नाही तर जगासाठी आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे.
तसेच बीएलएने असेही म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला असले तर आमचे समर्थन पहिले असलेय बीएलएने म्हटले की, भारताच्या या निर्णयानंतर लगेचच त्यांचे सैनिक पाकिस्तानाल वेढा घातलतील.
बीएलएने म्हटले आहे की, पाकिस्तान अण्वस्त्रांची धमक देण्याच्या बहाण्याने दहशतवाद्यांचे पालनपोषण करतो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो. हा केळ अनेक वर्षापासून सुरु आहे. यामुळे हा खेळ संपवण्यासाठी बुलच आर्मीने म्हटेल आहे की, पाकिस्तानला फक्त तेच संपवू शकता. यासाठी पाकिस्तान पूर्ण उद्ध्वस्त करावा लागेलय
दरम्यान बीएलएने पाकिस्तान सरकारला अल्टीमेटम दिला आहे. बीएलएने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली आहे. जगातील कोणतीही शक्ती याला थांबवू शकणार नाही अस बीएलएने म्हटले आहे. नाहीतर रक्तपात होईल असा अल्टीमेटम बीएलएने पाकिस्तानला दिला आहे.